Lion cubs super cute video : सोशल मीडियावर प्राण्यांचे अनके व्हिडीओ व्हायरल होत असतात. माणसांप्रमाणे प्राण्यांच्याही जीवनात दररोज काही ना काही गोष्टी घडत असतात. जंगलातील प्राण्यांपासून स्वतःचे संरक्षण, अन्न-पाण्यासाठी त्यांची धडपड, प्राण्यांच्या कुटुंबातील त्यांची काही मजेशीर, तर चकित करणारी त्यांची दृश्यंसुद्धा अनेकदा पाहायला मिळतात. आता सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये एका फोटोग्राफरने सिंहाच्या शावकांचा एक फॅमिली फोटो शेअर केला आहे. व्हायरल व्हिडीओ दक्षिण आफ्रिकेचा आहे. दक्षिण आफ्रिकेच्या मालामाला गेम रिझर्व्हमध्ये गुहेबाहेर सिंहाच्या चार शावकांचं दर्शन झालं आहे. व्हिडीओची सुरुवात गुहेबाहेर खडकावर बसलेल्या सिंहाच्या दोन शावकांनी होते. काही क्षणांनंतर त्यांची भावंडंसुद्धा ते खेळत असलेल्या खेळात सामील होतात; सिंहाचे हे शावक एकमेकांना मिठी मारतात, खेळतात आणि शेवटी त्यांचे लक्ष हे सुंदर दृश्य कॅमेऱ्यात पकडणाऱ्या फोटोग्राफरकडे जाते. सिंहाच्या शावकांचा फॅमिली फोटो व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा… हेही वाचा.बर्ड फ्ल्यूचं व्हॅक्सिन न घेणाऱ्यांना सैनिक देणार शिक्षा? बिल गेट्स आणि डब्ल्यूएचओचा अजब नियम; नेमकं खरं काय ? व्हिडीओ नक्की बघा. https://www.instagram.com/reel/C8sMRNfI1St/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading फॅमिली फोटोसाठी पोज : सध्या मोबाईल, कॅमेऱ्यामुळे स्टुडिओमध्ये जाऊन फोटो काढण्याचं प्रमाण अगदीच कमी झालं आहे. तुम्हाला आठवत असेल की, एक आठवण म्हणून पूर्वी स्टुडिओमध्ये स्वतःचे सिंगल, भावंडांबरोबर, तर आई-बाबा असणारा एक फॅमिली फोटो आवर्जून काढला जायचा. आज असाच काहीसा फॅमिली फोटो व्हायरल व्हिडीओत पाहायला मिळाला आहे. खडकावर बसलेले सिंहाचे चार शावक सुरुवातीला खेळतात, एकमेकांना मिठी मारतात आणि मग फोटोग्राफ्रकडे पाहून फॅमिली फोटोसाठी पोजही देतात. या व्हिडीओतील आणखीन एक खास गोष्ट अशी की, फोटोग्राफरकडे पाहताना या सिंहाच्या चारही शावकांची बसण्याची स्टाईल, त्यांचे हावभाव अगदीच सारखे आहेत; जे तुमचंही नक्कीच लक्ष वेधून घेतील एवढं नक्की. सोशल मीडियावरून हा व्हिडीओ malamalagamereserve या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरीसुद्धा सिंहाच्या शावकांचे फॅन झाले आहेत. त्यामुळे या शावकांचे कौतुक करताना ते कमेंट करताना दिसून आले आहेत