Shocking Lion Attack on Zebra: सिंह-सिंहिणींच्या तावडीत एकदा सापडल्यानंतर एखाद्या प्राण्याचं जिवंत सुटणं जवळपास अशक्य होऊन जातं. इतकंच नाही तर ते जगातील सर्वात धोकादायक शिकारी मानले जातात. ते काही मिनिटातच बलाढ्य प्राण्याचाही जीव घेतात. जंगलात जिवंत राहणं सोपं काम नाही, कारण कधी कुठून हल्ला होईल सांगता येत नाही. जंगलातला एकच नियम, जगा किंवा मारा आणि याच नियमाची साक्ष देणारं एक थरकाप उडवणारं दृश्य सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. हे व्हिडीओ कधी थरारक असतात, तर काही व्हिडीओ मजेदार असतात. त्यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. या व्हिडीओमध्ये दिसतं की, जंगलाची राणी सिंहिण एका झेब्र्यावर अशा पद्धतीने तुटून पडते की, शिकार फस्त करते. ही घटना इतकी थरारक आहे की पाहणाऱ्याच्या अंगावर अक्षरशः शहारे येतील.
व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतं की, जंगल सफारीसाठी आलेली एक गाडी रस्त्याच्या मधोमध उभी आहे. त्या गाडीतील पर्यटक फोटोंसाठी तयारी करत असतानाच अचानक एक झेब्रा धावताना दिसतो. पण, त्याला कुठूनच अंदाज येत नाही की त्याचा मृत्यू काही पावलांवर उभा आहे. काही क्षणांतच झुडपांमधून एक सिंहिण झेप घेते आणि झेब्रा थेट जमिनीवर पडतो.
या सिंहिणीचा वार इतका जबरदस्त असतो की झेब्र्याला उठून पळण्याची संधीही मिळत नाही. एकाच झटक्यात ती त्याला जेरबंद करते आणि काही सेकंदांत शिकार संपते. हे दृश्य इतकं भीषण आहे की, कॅमेऱ्यामागूनही भय जाणवतं.
हा थरारक व्हिडीओ naturehuntdiaries या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हजारोंनी हे दृश्य पाहिलं असून कमेंट्सच्या माध्यमातून विविध प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. एक युजर लिहितो, “जंगलात एवढा निर्दयीपणा याआधी कधीच पाहिला नव्हता”, तर दुसऱ्याने म्हटलं, “सिंहिणींच्या त्या एक झटक्यानं सर्व संपवलं… शब्द नाहीत!”
येथे पाहा व्हिडीओ
काहींनी मात्र असा सवाल उपस्थित केला की, “सफारी गाडीतील लोकांनी काही प्रयत्न करायला नको होते का?” पण जंगलाचा नियमच असा आहे. हस्तक्षेप न करता निसर्गाचं स्वतःचं चक्र चालू देणं. एकंदरीत, ही घटना जंगलातील वास्तव दाखवणारी आहे, इथे जो कमकुवत, त्याचं अस्तित्व टिकवणं अवघडच. आणि हेच वास्तव पुन्हा एकदा सिंहीणीच्या या थरारक शिकारीनं सिद्ध केलं आहे.