नवीन वर्ष संपायला आता फक्त दोन आठवडे उरले आहेत. त्यानंतर नवे वर्ष, नवे नियोजन आणि नवे संकल्प. ‘काय करावे’ यापासून ते ‘काय करू नये’ अशी यादीच तयार करायला सुरुवात झाली असेल. या नवीन वर्षांत तुम्ही जर कुठे लांब फिरायला जायचा विचार करत आहात तर मात्र तुमच्यासाठी हे नवे वर्ष चांगलेच फायद्याचे ठरणार आहे. कारण २०१७ मध्ये चक्क दोन डझन सुट्ट्या मिळणार आहे.

वाचा : ५०० रुपयांच्या जुन्या नोटेपासून विद्यार्थ्याने केली विद्युत निर्मिती

असेही काही जण असतात जे कॅलेंडर तारिख पाहण्यासाठी नाही तर सुट्ट्यांची यादी पाहण्यासाठी चाळत असतात. अशांसाठी खुशखबर म्हणजे यंदा दहा पंधरा नाही तर चक्क २४ सुट्ट्या आल्या आहेत. विशेष म्हणजे ज्यांना
आठवड्यातून शनिवार, रविवार सुट्टी आहे त्यांना या सुट्ट्यांची अधिक चांगल्यारितीने मजा घेता येणार आहे. कारण या यादीतील ब-याच सुट्ट्या शुक्रवारी आल्या आहेत. तेव्हा नशिबान माणसांना या वर्षांत आठवड्याला तीन तीन सुट्ट्यांचा आनंद घेता येणार आहे. २४ सुट्टयांपैकी एकूण ५ सुट्ट्या या शुक्रवारी आल्या आहेत. त्यामुळे शनिवार, रविवार साप्ताहिक सुट्टी पकडली तर १७ दिवसांच्या सुट्टीचा आनंद अनेकांना घेता येणार आहे. याशिवाय, वर्षातले पाच सण हे सोमवारी आले आहेत. एकुण हिशोब करायचा झाला तर या सुट्टामुळे वर्षभरात अशा ३४ सुट्ट्या तर नक्कीच मिळणार आहे.

२०१७ मधील सुट्ट्याची यादी पुढीलप्रमाणे
२६ जानेवारी- गुरूवार- प्रजासत्ताक दिन
१९ फेब्रुवारी- रविवार- शिवाजी महाराज जयंती
२४ फेब्रुवारी- शुक्रवार- महाशिवरात्री
१३ मार्च – सोमवार- होळी धूलिवंदन
२८ मार्च- मंगळवार- गुढीपाडवा
४ एप्रिल- मंगळवार- रामनवमी
१ एप्रिल- रविवार- महावीर जयंती
१४ एप्रिल- शुक्रवार- डॉ. आंबेडकर जयंती
१४ एप्रिल- शुक्रवार- गुडफ्रायडे
१ मे- सोमवार- महाराष्ट्र दिन
१० मे- बुधवार- बुद्ध पौर्णिमा
२६ जून – सोमवार- रमजान ईद
१५ ऑगस्ट- मंगळवार- स्वातंत्र्य दिन
१७ ऑगस्ट – गुरुवार- पारसी न्यू इअर
२५ ऑगस्ट- शुक्रवार- गणेश चतुर्थी
२ सप्टेंबर- शनिवार- बकरी ईद
३० सप्टेंबर- शनिवार – दसरा
१ ऑक्टोबर- रविवार- मोहरम
२ ऑक्टोबर- सोमवार- महात्मा गांधी जयंती
१९ ऑक्टोबर – गुरूवार – दीपावली-लक्ष्मीपूजन
२० ऑक्टोबर- शुक्रवार – बलिप्रतिपदा
४ नोव्हेंबर – शनिवार- गुरूनानक जयंती
१ डिसेंबर- शुक्रवार – ईद ए मिलाद
२५ डिसेंबर- सोमवार- नाताळ