Viral video: सोशल मीडियावर नेहमी अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ मजेशीर असतात. तर काही व्हिडिओ बघून अंगावर काटा येतो. लहान मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागतं. त्यांच्याकडे झालेलं थोडसं दुर्लक्ष अनेकदा महागात पडू शकतं. बच्चेकंपनी खेळताखेळता काय करतील, याचा नेम नसतो. त्यामुळे तुमच्या घरी लहान मुलं असल्यास ही बातमी नक्की वाचणं गरजेचे आहे. कारण हल्ली धावपळीचं आयुष्य जगताना आपल्या मुलांकडे दुर्लक्ष होतं आणि अनेक अनुचित प्रकार घडत आहेत. अशीच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन वर्षांचा निरागस मुलगा खेळता खेळता काय करतोय, याची त्यालाच कल्पना नव्हती. हा खोडकर चिमुकला आपल्या घरात खेळत होता. घरात इतर सदस्यही होते, पण काही वेळासाठी त्याच्याकडे कुणाचं लक्ष गेलं नाही. आणि हाच मुलगा खेळता खेळता कसा काय तांब्याच्या कलशात अडकला, हे कुणालाच समजलं नाही. जेव्हा त्याने रडायला सुरुवात केली, तेव्हा अचानक घरच्यांचं लक्ष त्याच्यावर गेलं. हे दृश्य पाहून सगळे थक्क झाले. हे कसं घडलं याचं कुणालाच आश्चर्य वाटलं, आणि घरात एकच गोंधळ उडाला.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हा.रल होत असून या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज गेले आहेत. नेटकरीही हा अपघात बघून अवाक झाले आहेत. तर पालकांनी मुलांकडे व्यवस्थित लक्ष देण्याचं आवाहन नेटकरी करत आहेत.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ newsdotz या पेवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकानं म्हंटलंय, “बापरे हे फार गंभीर आहे लहान मुलांकडे लक्ष देत जा” तर आणखी एकानं म्हंटलंय की, “बाळाचं कौतुक आहे अजिबात घाबरलेलं नाही.”