Viral video: माणसाला घडवण्यात, बिघडवण्यात, संकटावर मात करण्यास परिस्थिती शिकवते. म्हणूनच गरिबी वाईट नसते, खरतंर हीच गरीबी आपल्याला लढायला शिकवते, असे म्हणले जाते. जबाबदारी ही वय पाहून येत नाही, पण एकदा आली की खांदे मजबूत करून जाते. आयुष्य जगण्यासाठी संघर्ष हा करावाचा लागतो. आयुष्याच्या प्रवासात अनेक वळणे येतात, अनेक चढ-उतारही येतात. मात्र हीच गरीबी चांगले संस्कारही करते. काटकसर करायला व पैशाची किंमत ओळखायला शिकवते, एखादी गोष्ट मिळेपर्यंत धीर धरण्याची सवय अंगी बाणवते. अशाच एका मुलाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यामध्ये गरिबीमध्येही कसं खुश राहायचं हे पाहायला मिळत आहे.

शेवटी संस्कार महत्त्वाचे

गरीब असो वा श्रीमंत संस्कार हे विकत घेता येत नाहीत. हे मोठ्यांकडून लहानांकडे येत असतात. परिस्थिती कशीही असूदेत शेवटी संस्कार महत्त्वाचे असतात हे या चिमुकल्यानं दाखवून दिलं आहे. याचमुळे या चिमुकल्याच्या एका कृतीनं लाखो नेटकऱ्यांची मनं जिकंली आहेत.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या चिमुकल्याचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाला केकसाठी पैसे नसल्यानं रव्याचा केक घरीच बनवला आहे. हे पाहून कदाचीत तुम्हाला त्याची दया येऊ शकते मात्र हा चिमुकला मिळालं आहे त्यातच खूप खूश असल्याचं दिसत आहे. पुढे त्यानं समोर असलेला केकही कापला आहे. त्यानंतर त्यानं कापलेला रव्याचा केक पहिल्यांदा घरातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती त्याच्या आजोबांना भरवला आहे. त्यानंतर तो पाया पडला, यावेळी क्षणभरही त्याच्या चेहऱ्यावरचं हसू कमी झालेलं नाही. यावेळी त्याची ही कृतीच सर्व काही सांगून जातेय.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> आजीनं बाप्पाच्या दर्शनासाठी कार्यकर्त्याचे धरले पाय, पण…, लालबागमधील संतापजनक VIDEO पाहून तुम्हीच सांगा यात चूक कुणाची ?

सोशल मीडियावर हा व्हिडीओ marathiasmitaofficial नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर “एक दिवस तू खूप मोठा होशील बाळा” “हे ही दिवस निघून जातील” “कोणी कोणी लहानपणी शिऱ्याचा (रव्याचा ) केक खाल्ला आहे.” “खूप सुंदर केक आहे.” अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.