scorecardresearch

थंडीने हुडहुडणाऱ्या शेळीसाठी या चिमुकल्याने काय केले एकदा पाहाच; Viral Video ने जिंकली नेटकऱ्यांची मनं

निरागसता म्हणजे काय ते दाखवणारा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच

थंडीने हुडहुडणाऱ्या शेळीसाठी या चिमुकल्याने काय केले एकदा पाहाच; Viral Video ने जिंकली नेटकऱ्यांची मनं
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये या चिमुकल्याने शेळीसाठी काय केले पाहा (फोटो: सोशल मीडिया)

लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं हे प्रसिद्ध वाक्य तुम्ही अनेकवेळा ऐकले असेल, याची प्रचितीही बऱ्याचदा आपल्याला येते. मोठया मंडळींनाही जमणार नाही अशी कामगिरी लहान मुलं करुन दाखवतात. त्यांची निरागसता आपलं मन जिंकते. लहान मुलांची निरागसता दाखवणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक चिमुकला शेकोटी शेजारी बसलेला दिसत आहे. थंडीपासून वाचण्यासाठी हा सोपा मार्ग आहे. पण तो एकटाच उब घेत नाहीये, तर तो तिथे असणाऱ्या शेळीलाही उब देत आहे. तो शेळीला मांडीवर बसवतो आणि हाताने उब देत असल्याचे दिसत आहे. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडिओ.

व्हायरल व्हिडीओ:

या व्हिडीओने नेटकऱ्यांची मनं जिंकली असून, ही गोंडस कृती लहान मुलांमधील निरागसतेचे प्रतिक असल्याचे मत व्हिडीओवर व्यक्त करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 18:53 IST

संबंधित बातम्या