Little Girl Dance On Marathi Song सोशल मीडियावर एखादे गाणे ट्रेंड होणे आणि त्यावर डान्स करत व्हिडिओ टाकणे हे काही आता नवीन गोष्ट राहिलेली नाही. पण मोजकेच व्हिडीओ असे असतात जे नेटकऱ्यांचे मन जिंकून देतात. सध्या सोशल मीडियावर लाल लाल कलरची बांगडी (Bangles) हे गाणे तुफान चर्चेत आहे. हे गाणे प्रसिद्ध मराठी गायक संजू राठोड (Sanju Rathod) यांचे एप्रिल २०२६ मध्ये प्रदर्शित केले आहे ज्यावर अभिनेत्री इशा मालविया हिने अप्रतिम डान्स केला आहे. हे गाणे चर्चेक आल्यापासून नेटकरी या गाण्याच्या प्रेमात पडले आहे. उत्साही लोक या गाण्यावर डान्स करत व्हिडीओ रील पोस्ट करत आहे दरम्यान या गाण्यावर एक चिमुकलीचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांना चिमुकलीचा डान्स प्रंचड आवडला असून तिचे तोंडभरून कौतुक केले जात आहे.
लाल लाल कलरची बांगडी गाण्यावर नाचली चिमुकली
इंस्टाग्रामवर adorable_aanyaa नावाच्या पेजवर या चिमुकलीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ‘लाल लाल कलरची बांगडी बांगडीचा कलर लाल…’ या गाण्यावर ही चिमुकली थिरकत आहे. चिमुकलीने लाल रंगाचा लेंहगा परिधान केला असून त्यावर पिवळ्या रंगाची ओढणी आकर्षकपणे गुंडाळली आहे. नाकात नथ घालून आणि हातात लाल रंगाच्या बांगड्या घालून ही चिमुकली अफलातून डान्स करत आहे. तिचा गोंडस लूक नेटकऱ्यांना खूप आवडला आहे. ती गाण्यावर अचूकपणे डान्स करत आहे. तिचे गोंडस हावभाव नेटकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू घेऊन येत आहे.
नेटकऱ्यांना प्रचंड आवडला चिमुकलीचा डान्स
व्हिडि जवळपास एक लाख चौऱ्याहत्तर हजार (१.७४ लाख) लोकांनी तिच्या व्हिडिओला लाइक केले आहे. तर जवळपास २५०० पेक्षा जास्त लोकांनी व्हिडीवर कमेंट करत तिचे कौतुक केले आहे. व्हिडिओवर कमेट करताना एकाने लिहिले की, किती गोंडस. दुसऱ्याने लिहिले की, “गोंडस मुलगी” एकाने इशा मालविया टॅग करत म्हटले “तुझे क्युट व्हर्जन”
एकाने म्हटले की,”ओरीजनल गाण्यापेक्षा खूप भारी नाचलीस”
चिमुकलीच्या या गोंडस डान्सने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला असून तिचा हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.
