सोशल मीडियावर रोज एकापेक्षा एक भन्नाट डान्स व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात अनेक डान्स व्हिडीओ फारच मजेशीर असतात, विशेषत: चिमुकल्यांचे डान्स व्हिडीओ हे पाहण्यासारखे असतात, कारण ते नाचता नाचता कधी काय करून जातात ते पाहून हसू येतं. पण, याच चिमुकल्यांचे काही डान्स व्हिडीओ खरंच कौतुकास्पद असतात. सध्या अशाच एका चिमुकलीचा जबरदस्त डान्स व्हिडीओ व्हायरल होतोय. यात ती अशी काही ठसकेबाज लावणी सादर करते की पाहून तुम्हालाही कौतुक वाटेल. चिमुकलीने गौतमी पाटीलपेक्षाही कातिल अदाकारी दाखवली आहे.

लावणी ही महाराष्ट्राची लोकनृत्य कला आहे. हीच लोकनृत्याची कला आजही तितक्याच प्रेमाने जपली जाते. या चिमुकलीने अशी काही लावणी सादर केली की, परीक्षण करणारे जजही तिच्या लावणीच्या प्रेमात पडले. चिमकुलीने दिलखेचक अदाकारी करत सुंदर लावणी सादर केली, चिमुकलीच्या या अदाकारी पुढे गौतमी पाटील देखील फेल आहे.

या व्हिडीओत चिमुकली ‘भिंगरी’ या मराठी चित्रपटातील “गोऱ्या गोऱ्या टाचेत काटा रुतला” या गाण्यावर लावणी सादर करताना दिसतेय. लावणीच्या बोलाप्रमाणे तिच्या स्टेप्सही तितक्याच ठसकेबाज आहेत. इतकंच नाही तर तिचे हावभावदेखील प्रत्येकाला भुरळ घालणारे आहेत. नऊवारी साडी, त्यावर मराठमोळा साजश्रृंगार असा पेहराव तिने केलाय. तिच्या डान्स स्टेप्स आणि हावभाव पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय, कारण इतक्या लहान वयात एवढ्या कमालीचे हावभाव करणं प्रत्येकालाच जमत नाही.

चिमुकलीचा हा जबरदस्त डान्स व्हिडीओ durva_z_15 नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर युजर्सही एकापेक्षा एक जबरदस्त कमेंट्स करतायत. एका युजरने कमेंट केली की, चिमुकलीच्या एक्स्प्रेशनला तोड नाही. दुसऱ्या एका युजरने लिहिले की, काय एक्स्प्रेशन लेकराचे, याला म्हणतात लावणीचे हावभाव…. नाहीतर लावणीच्या नावाखाली आजकाल फक्त केस उडवले जातात. तिसऱ्या युजरने लिहिले की, खतरनाक, मूर्ती लहान किर्ती महान, जबरदस्त बाळा.. काहींनी गौतमी पाटीलनं हिच्याकडून कशी लावणी सादर करावी हे शिकलं पाहिजे असा सल्ला दिलाय.