Viral video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. वेगवेगळ्या डान्सचे तर अनेक व्हिडीओ या मंचावर शेअर केले जातात. सध्या एका चिमुकलीचा असाच एक मजेदार आणि मूड फ्रेश करणारा डान्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.सोशल मीडियावर लहान मुलांचे डान्स करतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही चिमुकले इतके सुंदर डान्स करतात की त्यांचे कौतुक करावे तितके कमी असते. सध्या अशाच एका चिमुकलीचा लावणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हा चिमुकलीनं सर्वांनाच वेड लावलंय.
लावणी हे महाराष्ट्राचे लोकनृत्य म्हणून ओळखले जाते. लावणी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. लोकसंस्कृतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणून लावणी ही लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर लावणीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकली सुंदर लावणी सादर करताना दिसत आहे. चिमुकलीच्या लावणीसमोर गौतमी पाटीलही फिकी पडेल अशी भन्नाट लावणी केली आहे.
हल्ली सतत अनेक नवी-जुनी गाणी पुन्हा पुन्हा चर्चेत येत असतात. या गाण्यांवर लहानांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक जण जमेल तसा डान्स करतो. त्यातील काही व्हिडीओ खूप चर्चेतही येतात. सध्या एका चिमुकलीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात ती लावणी करताना दिसतेय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर कायम लहान चिमुकल्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात. कधी त्यांची मस्ती असते तर कधी रडून घरात धुमाकूळ घालतात. मात्र अनेकदा या चिमुकल्याचे व्हिडिओ पाहून प्रत्येकजण हैराण होतो. सध्या एका चिमुकलीचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो डान्स पाहून भले भले डान्सर नक्की हैराण होतील. सोशल मीडियावर हा व्हिडीओ 5179suresh या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे.नेटकऱ्यांच्या व्हिडीओवर तुफान प्रतिक्रिया येत आहेत. हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून अनेकांनी व्हिडीओला लाईक आणि शेअर केलं आहे. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,”खूपच छान अप्रतिम” तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,”खूप खूप छान आरारा नादचखुळा” तर अजून एका यूजरने लिहिले आहे की,”खुपच सुंदर डांस बेटा” अशा अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.
