Viral Video: सोशल मीडियावर कधी डान्स, तर कधी गाणी, कधी अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. त्यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की, ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. सोशल मीडिया हे लोकांसाठी आपल्या कला सादर करण्याचे एक अनोखे माध्यम बनले आहे. कोणी डान्स, तर कोणी स्टंट, तर कोणी चित्रकलेच्या माध्यमातून आपले कौशल्य जगासमार मांडतात. गेल्या काही दिवसांपासून एका चिमुकलीचा डान्स हा नेटकऱ्यांना वेड लावतं आहे. काय ती अदा, काय तो नखरा, काय ते डान्स स्टेप्स या चिमुकलीच्या डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एकदा पाहून पण नेटकऱ्यांचं मन भरतं नाही आहे. ते हा व्हिडीओ वारंवार पाहतं आहेत. आतापर्यंत या व्हिडीओ हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहून प्रत्येका तोंडून एकच वाक्य निघतंय क्या बात है.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, चिमुकली शाळेच्या कार्यक्रमात भन्नाट डान्स करत आहेत. “हमको आज कल है इंतज़ार कोई आये लेके प्यार हमको आज कल है इंतज़ार कोई आये लेके प्यार” गाण्यावर जबरदस्त असा डान्स केला आहे. ज्यामधील तिच्या अदा आणि डान्स स्टेप्सची सर्वांनाच भुरळ पडली आहे. डान्स व्हिडिओ पाहून तुमचेही पाय थिरकल्याशिवाय राहणार नाहीत. डान्स आणि एकेक अदा इतक्या सुंदर आहेत की पाहणाऱ्याला आपोआप भुरळ पडते. तिच्या या अदांवर नेटकऱ्यांनीही चांगल्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत. चिमुकलीच्या डान्स प्रमाणेच त्यांच्या लूकनेही पाहणाऱ्यांना चांगलेच वेड लावले आहे. चिमुकलीचे गाण्याच्या बीटवरील सोज्वळ आणि गोड हावभाव हे प्रत्येकाचं मन जिंकतात आणि एकदम भन्नाट डान्स करून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ priha_pristy या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे.नेटकऱ्यांच्या व्हिडीओवर तुफान प्रतिक्रिया येत आहेत. हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून अनेकांनी व्हिडीओला लाईक आणि शेअर केलं आहे.
