scorecardresearch

Premium

”पाव्हणं जेवला काय?” गाण्यावर थिरकल्या चिमुकल्या; दोघींचा डान्स पाहून तुम्ही गौतमी पाटीललादेखील विसरून जाल

”पाव्हणं जेवला काय? गाण्यावर चिमुकल्या मुलींनी केले भन्नाट्ट नृत्य; गौतमी पाटीलला टक्कर देतायेत दोघी, पाहा व्हिडिओ

Little Girls dance on pahun jevla kay
'पाव्हणं जेवला काय?'' चिमुकल्यांनी केला भन्नाट डान्स (फोटो सौजन्य – इंस्टाग्राम -mydreamgirl111

सोशल मीडियावर रोज नवनवीन अनेक गाण्यांवरील व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यापैकीचं एक गाण म्हणजे, ”पाव्हणं जेवला काय?”. या गाण्याचे बोल ऐकून तुमच्या डोळ्यासमोर गौतमी पाटील नक्कीच आली असेल. या गाण्यावरील तिच्या अदा आणि नृत्याने अनेकांना वेडं लावलयं. पण सध्या हे गाणं गौतमी पाटीलमुळे नव्हे तर दोन चिमुकल्यांमुळे चर्चेत आले आहे. सोशल मीडियावर दोन चिमुकल्या मुलींचा या गाण्यावर नाचतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. चिमुकल्यांचे हावभाव आणि नृत्य इतके गोंडस आहे की तुम्ही गौतमी पाटीलला देखील विसरून जाल.

चिमुकल्यांनी नृत्यामध्ये दिली गौतमी पाटीला टक्कर

supriya and shahid
“माझ्यासाठी तो…”; शाहीद कपूरबाबत सावत्र आई सुप्रिया पाठक यांचं वक्तव्य, म्हणाल्या, “त्याची दोन्ही मुलं…”
Belt or dress Netizens laughed at the strange dress Said it it Urfi Javed Dress
बेल्ट आहे की ड्रेस? विचित्र ड्रेस पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली; म्हणाले, ”उर्फी जावेद…”
Amchya Pappani Ganpati Anala Song Viral anoter little boy ganpati video viral instagram trending now
आमच्या पप्पांनी गणपती आणला! रीलस्टार साईराजनंतर ‘या’ चिमुकल्याचा Video जिंकतोय नेटकऱ्यांचं मन
marathi actor kiran mane
Video: किरण मानेंचा ‘चलेया’ गाण्यावर जबरदस्त डान्स; व्हिडीओ शेअर करत म्हणाले, “लाडक्या…”

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दोन लहान मुली नऊवारी साडी परिधान करून सुंदर नटलेल्या दिसत आहे. दोघीही आपल्या गोंडस आवाजात हे गाणे म्हणत आहे आणि त्यावर सुंदर नृत्य देखील करत आहे. दोघींच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे आहेत. विशेष म्हणजे दोघींनाही गाण्याचे बोल तोंडपाठ आहेत. हा व्हिडीओ पाहून तुमच्या चेहऱ्यावर हसू नक्की येईल.

हेही वाचा – ‘बादल बरसा बिजुली’ गाण्यावर चिमुकल्याने केला जबरदस्त डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल त्याचे चाहते

हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर mydreamgirl111 या अकांउटवर पोस्ट केला आहे. व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला असून अनेकांना तो आवडला आहे. अनेकांनी दोघींचे कौतूकही केले आहे.

हेही वाचा – लग्नापत्रिकेत नवरा-नवरीच्या नावासमोर लिहिली IIT डिग्री; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

”पाव्हणं जेवला काय?” हे गाणे नक्की कोणी गायले आहे?
”पाव्हणं जेवला काय?” हे गाणे जरी गौतमी पाटीलच्या लावणी नृत्यामुळे प्रसिद्धीस आले असले तरी हे गाणे गायिका राधा खुडे हिने गायले आहे तर प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांनी हे गाणे लिहिले आहे. अवधूत गुप्ते यांनी युट्युबवरील अधिकृत चॅनेलवर तुम्ही हे गाणे पाहू शकता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Little girl dance on pahun jevla kay song which famous for gautami patil lavani video viral snk

First published on: 15-09-2023 at 12:15 IST

संबंधित बातम्या

क्विझ ×