girl dance on lal lal colour chi bangdi song : संजू राठोडची सगळीच गाणी सोशल मीडियावर सगळ्यांच्या पसंतीस उतरतात. या कलाकाराने मनोरंजनविश्वात स्वत:ची एक वेगळी छाप उमटवली. गुलाबी साडी, नऊवारी गाण्यांना लाखो लोकांचा प्रतिसाद मिळाल्यामुळे मराठी संगीतक्षेत्रात त्याने एक विशिष्ट असं स्थान निर्माण केलं आहे. काही महिन्यांपासून ‘लाल लाल कलरची बांगडी’ या संजू राठोडच्या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळत आहे. एका चिमुकलीने सुद्धा या गाण्यावर जबरदस्त डान्स केलेला दिसतो आहे.
अनेकदा ठरवून केलेल्या डान्सपेक्षा अचानक रंगलेला डान्स सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका कार्यक्रमात अचानक ‘लाल लाल कलरची बांगडी’ हे लोकप्रिय गाणं वाजताच एका चिमुकलीने आणि तिच्या वहिनीने क्षणाचाही विलंब न करता गाण्याच्या हुक स्टेप्स करत भन्नाट डान्सला सुरुवात केली. दोघींनी एकमेकींना सुंदर साथ देत केलेल्या या उत्स्फूर्त सादरीकरणाने उपस्थितांची तसेच नेटकऱ्यांची मनं जिंकली.
‘लाल लाल कलरची बांगडी’ या गाण्यावर अनेक मुली, तरुणी, महिला आणि प्रोफेशनल डान्सर्सचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. मात्र, एका या दोघींच्या डान्सने सध्या सोशल मीडियावर सर्वांची मने जिंकली आहेत. दोघींच्याही परफेक्ट स्टेप्स, गोंडस हावभाव आणि निरागस डान्स पाहून नेटकरीही भारावून झाले आहेत. ‘लाल लाल कलरची बांगडी’ गाण्यावर चिमुकलीने वहिनी बरोबर कशाप्रकारे डान्स केला व्हायरल व्हिडीओतून एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @yuktibobade24 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून “उकडीचा मोदक”, “काय जोश आहे”, “भारी”, खूप मस्त युक्ती, तर काही जण इमोजीसह दोघींच्या डान्स व्हिडीओचे कौतुक करताना कमेंट्समध्ये दिसून आले आहेत.
