Viral video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. वेगवेगळ्या डान्सचे तर अनेक व्हिडीओ या मंचावर शेअर केले जातात. सध्या एका चिमुकल्याचा असाच एक मजेदार आणि मूड फ्रेश करणारा डान्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.सोशल मीडियावर लहान मुलांचे डान्स करतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही चिमुकले इतके सुंदर डान्स करतात की त्यांचे कौतुक करावे तितके कमी असते. सध्या अशाच एका चिमुकलीचा डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हा चिमुकलीनं सर्वांनाच वेड लावलंय. मात्र यावेळी तिच्या भावाने जी एन्ट्री घेतलीय ती पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.
सगळ्या नात्यांमध्ये अगदी वेगळं नातं कोणाचं असेल, तर ते भाऊ- बहिणीचं! ते दोघे एकमेकांशी भांड भांड भांडतील; पण त्या दोघांतल्या प्रेमाला कधीच ओहोटी लागत नाही. त्यांचं एकमेकांशी कधीच पटणार नाही; पण त्या दोघांच्याही मनात सातत्याने एकमेकांबद्दल मायेचा ओलावा पाझरत असतो.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता एक चिमुकली दिसून येत आहे. जिने पिवळ्या रंगांचा सुदंर ड्रेन परिधान केलेला आहे, जो तिला अतिशय छान दिसत आहे. त्यानंतर चिमुकली व्हिडिओत पाहात डान्स करण्यास सुरुवात करते. चिमुकलीचे गाण्याच्या बीटवरील सोज्वळ आणि गोड हावभाव हे प्रत्येकाचं मन जिंकतात आणि एकदम भन्नाट डान्स करून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो. मात्र, चिमुकलीच्या पाठी पाहिले असता तिचा भाऊ पडद्याच्या पाठून लपून पाहतो. मध्येच बहिणीला चिडवतानाही दिसत आहे, या चिमुकलीपेक्षा मागे असणाऱ्या भावानाचे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. बहिणीच्या खोड्या काढायला भाऊ नेहमी पुढे असतो, अशाच या भावा बहिणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ bomrilendo6 या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे.नेटकऱ्यांच्या व्हिडीओवर तुफान प्रतिक्रिया येत आहेत. हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून अनेकांनी व्हिडीओला लाईक आणि शेअर केलं आहे.