Viral video: सोशल मीडियावर नेहमी अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ मजेशीर असतात. तर काही व्हिडिओ बघून अंगावर काटा येतो. लहान मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागतं. त्यांच्याकडे झालेलं थोडसं दुर्लक्ष अनेकदा महागात पडू शकतं. लहान मुलांकडे थोडस दुर्लक्ष केल्यानं अनुचित प्रकार घडल्याचे प्रसंग अनेकदा समोर आले आहेत.घरात लहान मूल असेल, तर आपल्याला सतत सावध राहावं लागतं.दरम्यान तुमच्या घरात जर लहान मूल असेल, तर ही बातमी तुम्ही आवर्जून वाचली पाहिजे.
पालकांचं थोडसं दुर्लक्ष अन्…
सगळीकडे गणेशोत्सवाचं वातावरण आहे, अशातच बाप्पा आले आणि निघालेही. दीड दिवसाचे, ५ दिवसाचे, ६ दिवसाचे आणि ७ दिवसाचे बाप्पा त्यांच्या गावाला गेलेही. याच बाप्पााच्या विसर्जनावेळी एक अशी घटना घडली की त्याचा कुणी विचारही केला नव्हता. त्याचं झालं असं की, गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी सर्व कुटुंब तलावाजवळ जमले होते. यावेळी सर्वजण पाण्याच्या काठाला उभे असताना अचानक चिमुकली पुढे जाते आणि पाण्यात पडते. अचानक सगळं घडतं त्यामुळे कुणाला काहीच कळत नाही.
गणपती विसर्जनावेळी नेमकं काय घडलं
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका तलावाच्या पायऱ्यांवर एक महिला, दोन पुरुष आणि तीन लहान मुलं आहेत, हे सगळे गणेश विसर्जनासाठी जमले आहेत. अशावेळी पाणी खूप खोल असल्यानं तो व्यक्ती पाण्यात न उतरता बाप्पाचं पायऱ्यांवरुन विसर्जन करतो. यावेळी एकीकडे बाप्पाचं विसर्जन तर दुसरीरडे ही चिमुकली थेट पाण्यात पडले. पाण्यात पडल्यानंतर ती पूर्णपणे दिसेनाशी होते, यावेळी कुटुंबामध्ये आरडा ओरडा होतो आणि तिला वाचवायला सर्वजण जातात. पुढे व्हिडीओ संपत असल्यानं नेमकं काय घडलं हे कळलं नाही. मात्र व्हिडीओ पाहून खरंच काळजाचा ठोका चुकत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> “आमचं लग्न होईना, मुख्यमंत्री आमच्यासाठी पण काढा लाडका भाऊ योजना” डीजेवर वाजलं भन्नाट गाणं; VIDEO पाहून पोट धरुन हसाल
हा व्हिडीओ jitendrasinghbouddh नावाच्या इनस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. लहान मुलांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अशा घटना उघडकीस येत आहेत. मात्र, अशा घटना वारंवार होऊ नयेत आणि गंभीर परिस्थिती उदभवू नये यासाठी पालकांनी मुलांकडे दुर्लक्ष होणार नाही या काळजी घ्यायला हवी.