Satara girl Push ups Video Viral: सोशल मीडियावर दर दुसऱ्या दिवशी काही ना काही व्हायरल होत असतं. यात लहान मुलांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. एका बाजूला जिथे लहान मुलं रिल्स आणि सोशल मीडियाच्या आहारी गेले आहेत, तिकडे काही मुलं अगदी लहान वयातच आपली कला दाखवून सोशल मीडियावर प्रसिद्ध होतात.

सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक ६ वर्षांची चिमुकली आपली कला दाखवत लोकांचं मन जिंकतेय. साताऱ्याच्या या मुलीने नेमकी कोणती कमाल केलीय, जाणून घेऊ या…

६ वर्षांच्या मुलीने केली कमाल (Little Girl Push Ups Viral Video)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक चिमुकली आपली कला दाखवताना दिसत आहे. व्हायरल व्हिडीओत आपण पाहू शकतो की अवघ्या ६ वर्षांची मुलगी पुश अप्स करताना दिसतेय. पण यापेक्षाही मोठी गोष्ट अशी की या मुलीने केवळ एक किंवा दोन पुश अप्स मारले नाहीयेत तर तब्बल १०० पुश अप्स मारले आहेत. यावरही कमालीची गोष्ट म्हणजे हे १०० पुश अप्स तिने फक्त एका मिनिटातच केले आहेत. सध्या चिमुकलीच्या या धाडसाचं इंटरनेटवर खूप कौतुक केलं जात आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @rajdhani__satara007 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल २.३ मिलियन व्ह्यूज आले आहेत. तसंच “साताराची ६ वर्षांची धाकड गर्ल स्वरा” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “वीर व वीरांगनांची भूमी, जय जिजाऊ जय शिवराय”, तर दुसऱ्याने “वाघीण लय भारी” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “मुंबई पोलिसांचा अभिमान आहे.” तर एकाने “दिवस रात्र तुम्ही जनतेच्या सेवेसाठी असता तुम्हीच विठ्ठल आणि तुम्हीच आमच्या रखुमाई” अशी कमेंट केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सोशल मीडियावरील हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.