Little Girl Lavni Dance Viral Video: गणपती उत्सव म्हटलं की ढोल-ताशांचा गजर, बाप्पाच्या जयघोषासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचीही रंगत पाहायला मिळते. याच उत्सवी वातावरणात एका चिमुकल्या मुलीने सादर केलेल्या लावणीने सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिचा आत्मविश्वास, नृत्याची शैली आणि तालावरची अचूक पकड पाहून नेटकरी तिचे कौतुक करताना दिसत आहेत.

‘कशाला लावतोस नाद…’ गाण्यावर भन्नाट ठेका

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरातील गणपती उत्सवाच्या कार्यक्रमात या व्हिडीओमध्ये चिमुकली ‘कशाला लावतोस नाद…’ या गाण्यावर लावणी सादर करताना दिसत आहे. पारंपरिक लावणीच्या ठेक्यावर तिच्या चेहऱ्यावरचे भाव आणि नृत्याच्या हालचाली पाहून अनेकांची नजर व्हिडीओवर खिळली आहे. हा व्हिडीओ @gaurimore_28 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

कमेंट्समध्ये चिमुकलीचं कौतुक

व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्समधून या चिमुकल्या कलाकाराचे कौतुक केले आहे. एका युजरने, “माझ्या मनात बसलीस बाळा”, अशी प्रेमळ प्रतिक्रिया दिली आहे. तर आणखी एका कमेंटमध्ये तिच्या नृत्याचे कौतुक करत लावणीतील बारकावे तिने छान आत्मसात केल्याचे म्हटले आहे.

चिमुकलीचा हा उत्साही अंदाज आणि तिच्या नृत्यातील निरागस आत्मविश्वास सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. गणपती उत्सवाच्या जल्लोषात सादर झालेल्या या लावणीने अनेकांच्या चेहऱ्यावर नक्कीच हास्य आणलं आहे.