Dance Viral Video : सोशल मीडिया असं एक माध्यम आहे, जिथे रोज नवनवीन टॅलेंट समोर येत असतं. कधी गाण्याचे, कधी अभिनयाचे तर कधी डान्सचे एकापेक्षा एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, ज्यात एक चिमुकली ढोलकीच्या तालावर अशी काही नाचतेय की, ते पाहून नेटकरीदेखील तिच्या अदाकारीवर फिदा झालेत. चिमुकलीने अशी काही ठसकेबाज लावणी सादर केली की, तिथे उपस्थित असलेल्यांनीही तिला दाद दिली.

व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एका भव्य रेकॉर्ड डान्स कार्यक्रमाचा स्टेज दिसत आहे. या स्टेजवर अवघ्या काही वर्षांची एक चिमुकली पारंपरिक नऊवारी साडी आणि त्यावर साजेसे दागिने घालून स्टेजवर उभी राहिली. अस्सल मराठी लूकमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत आहे. जशी गाण्यात ढोलकी वाजायला सुरुवात होते तशी चिमुकली अगदी ठसकेबाज लावणी सादर करते, चिमुकलीचे हावभाव (Expressions) व अदाकारी आणि एकेक स्टेप्स पाहून भल्याभल्या डान्सर्सना घाम फुटेल.

तिच्या पायातील घुंगरांचा आवाज आणि ढोलकीचा ताल यांचं अचूक टायमिंग व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. लावणी गाण्यातील प्रत्येक शब्दावर तिने दिलेले ठसकेबाज हावभाव मनाला भुरळ पाडणारे आहेत. तिचा हा आत्मविश्वास आणि नृत्यकौशल्य पाहून सोशल मीडिया युजर्स तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करीत आहेत.

https://www.instagram.com/reel/DZm27OZSuMg/?utm_source=ig_web_button_share_sheet

हा व्हिडीओ सध्या इन्स्टाग्राम vloger_yuvaraj_’s नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर युजर्सही वेगवेगळ्या कमेंट्स करीत आहेत. एका युजरने लिहिले की, खूप मस्त, अशीच नाचत राहा. दुसऱ्याने लिहिले की, जबरदस्त डान्स. तिसऱ्याने लिहिले की, क्या बात है, लय भारी. या चिमुकलीच्या अस्सल मराठी ठसक्याने सध्या इंटरनेटवर चांगलाच राडा घातला आहे.