Litile Girl Lavani Dacne : महाराष्ट्राची पारंपरिक लोककला असलेली लावणी ही गेल्या अनेक दशकांपासून रसिकांचे मनोरंजन करत आली आहे. बदलत्या काळात हिप-पॉप, के-पॉपसारख्या आधुनिक नृत्यप्रकारांची क्रेझ वाढली असली, तरीही लावणीचे महत्त्व अजूनही कमी झालेले नाही. मात्र, अस्सल लावणी सादर करणारे कलाकार दिवसेंदिवस कमी होत चालल्याची खंत अनेक जाणकार व्यक्त करतात. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर काही कलाकार पारंपरिक लावणी जपताना दिसतात आणि त्यांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका चिमुकलीच्या लावणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला असून, तिच्या नृत्याने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत.

चिमुकलीची ठसकेबाज लावणी (Little Girl Lavani Dance)

व्हायरल व्हिडीओमध्ये एक चिमुकली नऊवारी साडी परिधान करून अत्यंत सुंदर लावणी सादर करताना दिसत आहे. चढविला पट्टा कमरेवरी या गाण्यावर चिमुकली लावणी नृत्य सादर करत आहे. ढोलकीच्या तालावर आणि गाण्याच्या बोलावर चिमुकली थिरकत आहे. तिचे हावभाव देखील पाहण्यासारखे आहेत. चिमुकलीच्या नृत्य कौशल्याचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. चिमुकलीची ठसकेबाज लावणी नेटकऱ्यांना प्रंचड आवडत आहे.

चिमुकलीच्या लावणी व्हिडीओ तुफान व्हायरल (Litile Girl Lavani Dance Video goes Viral)

व्हायरल व्हिडीओ इंस्टाग्रामवर महाराष्ट्राची लोकधारा यापेजवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, शिवाज्ञाची जबरदस्त लावणी.चढविला पट्टा कमरेवरी. महाराष्ट्राच्या छोट्या शिवाज्ञाचा हा डान्स तुम्हाला कसा वाटला? “
व्हिडीओ जवळपास ८७ हजार पेक्षा जास्त लोकांना आवडला आहे. व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी चिमुकलीचे कौतुक केले आहे.

चिमुकलीच्या लावणीवर नेटकरी झाले फिदा (Netizen Loved Litile Lavani Girl)

एकाने कमेंट केली की, “किती छान नाचतं लेकरू”
दुसऱ्याने कमेंट केली की, शिका हिच्याकडून लावणी कशी असते.
तिसऱ्याने कमेंट केली की, अगं बाई ही काय कमालाच झाली. मोठ्यांना लाजवेल अशी लावणी सम्राज्ञी.
चौथ्याने कमेंट केली “अप्रतिम आणि अलौकिक असे नृत्य… एखाद्या नृत्यांगनानां ही लाजवेल असं .. “
पाचव्याने कमेंट केली, किती भारी डान्स, कडक
सहाव्याने कमेंट केली, कला खूपच सुंदर अवगत केली आहे देशासाठी महाराष्ट्रची लावणी म्हणून मोठ्या मोठ्या व्यासपिठावर तिला न्यावे. खूपच पुढे जाईल लेकरू.”

अनेकांनी चिमुकलीच्या लावणीची तुलना गौतमी पाटील बरोबर केली आणि तिच्यापेक्षा चांगले नृत्य करत असल्याचे सांगितले.

या व्हायरल व्हिडीओमुळे पारंपरिक लावणी कलेबद्दल नव्याने चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी अशा लहान वयात पारंपरिक कला शिकणाऱ्या मुलांना योग्य व्यासपीठ मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. काही नेटकऱ्यांनी या चिमुकलीला मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये संधी देण्याची मागणीही केली आहे. लहान वयातच इतक्या आत्मविश्वासाने आणि अचूक तालावर नृत्य सादर करणे हे तिच्या मेहनतीचे आणि प्रशिक्षणाचे द्योतक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. अशा कलागुणी मुलांमुळे महाराष्ट्राची समृद्ध लोककला पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असेही अनेकांनी नमूद केले आहे.