VIRAL VIDEO : ‘या’ छोट्या मुलीने गोड आवाजात ऐकवली अमृता प्रीतम यांची ‘मैं तेनु फिर मिलांगी’ कविता

अमृता प्रीतम यांची आयकॉनिक कविता ‘तेनू फिर मिलंगी’ सोशल मीडियावर बरीच चर्चेत आलीय. लहान्यांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत ही कविता साऱ्यांचंच मन जिंकून घेताना दिसून येतेय. या कवितेच्या ओळी ‘मनमर्जियां’ चित्रपटात सुद्धा वापरल्या आहेत. हीच कविता एका लहान मुलीच्या गोड आवाजात ऐका…

kid-poem-viral
(Photo: Instagram/ shivani.j.khanna)

अमृता प्रीतम यांची आयकॉनिक कविता ‘तेनू फिर मिलांगी’ सोशल मीडियावर बरीच चर्चेत आलीय. लहान्यांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत ही कविता साऱ्यांचंच मन जिंकून घेताना दिसून येतेय. ही कवितेची क्रेझ पाहता आतापर्यंत तिला नाटकांच्या रूपात दाखवली गेली आहे. इतकंच काय तर या कवितेच्या ओळी चित्रपटात सुद्धा जोडल्या गेल्या आहेत. अनेक गाण्यांमध्येही या ओळी वापरल्या गेल्या आहेत. अभिनेत्री तापसी पन्नूने तिच्या ‘मनमर्जियां’ चित्रपटात सुद्धा या कवितेच्या काही ओळी वापरल्या होत्या. या कवितेच्या ओळी सर्वांनाच भावताना दिसून येत आहेत. त्यानंतर आता एका चिमुरडीने आपल्या मधुर आवाजात ही कविता सादरा केलीय. याचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. इंटरनेटवर लोकांना हा व्हिडीओ खूप भावलाय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या गोड मुलीचं नाव कियारा खन्ना असं आहे. या चिमुकलीया यापूर्वी आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये या छोट्याश्या मुलीने ‘शेरशाह’ मधील कियारा अडवाणीचा डायलॉग कॉपी केला होता आणि त्या मुलीची क्लिप बघता बघता सोशल मीडियावर व्हायरल सुद्धा झाली होती. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या मुलीचा व्हिडीओ शेअर केला होता.

त्यानंतर आता या छोट्या मुलीचा हा नवा व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये ही चिमुकली कियारा अभिनेत्री तापसी पन्नूच्या व्हॉईस-ओव्हरसह एक कविता सुंदर हावभावांनी म्हणताना दिसत आहे. या व्हिडीओतले मुलीचे हावभाव पाहिले तर कोणीही तिच्यावर इम्प्रेस होईल. याचमुळे कदाचित बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने यापूर्वी तिचा व्हिडीओ शेअर करत तिचं भरभरून कौतुक केलं होतं. गुलाबी रंगाचा सलवार कमीज परिधान करत ही गोड मुलगीच्या तितक्याच गोड आवाजात म्हटलेली की कविता ऐकून नेटिझन्सना तिचं कौतुक केल्याशिवाय रहावत नाहीय.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : नवरदेवाच्या मित्रांचा ‘धांसू’ डान्स; स्टेजवर केलं असं काही की पाहताच लाजेनं गुलाबी झाली नवरी

इथे पाहा हा व्हिडीओ :

आणखी वाचा : दोघांत तिसरा? ‘टायटॅनिक’ फेम अभिनेत्यासोबत गर्लफ्रेंडच्या ‘त्या’ VIRAL VIDEO वर अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस म्हणाले…

या चिमुकलीच्या गोड आवाजातली ही कविता अनेक नेटिझन्स सोशल मीडियावरील वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर करताना दिसून येत आहेत. सुंदर हावभावांसोबत ही सुंदर शब्दांची कविता ऐकून नेटिझन्सनी या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. या व्हिडीओवर लोक अनेक सुंदर कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले, “सुपर टॅलेंटेड.” दुसर्‍या युजरने कमेंट केली की, “ही सर्वात सुंदर सीरिज आहे.”

कियारा खन्नाचे सोशल मीडिया अकाउंट्स तिचे पालक सांभाळतात. तिच्या इंस्टाग्रामवर आणखी तिचे बरेच व्हिडीओ आहेत जे शेअर करताच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तुम्ही सर्वजण तिचे सर्व व्हिडीओ shivani.j.khanna नावाच्या पेजवर पाहू शकता. तिच्या नव्या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि हजारो कमेंट्स आल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Little girl recites amrita pritam iconic poem main tenu phir milangi in viral video prp

Next Story
…म्हणून हे छायाचित्र इंटनरनेटवर ठरतयं प्रचंड लोकप्रियThis One Photo Sums Up the Difference Between the Generations , viral photo, The internet loves this photo , Loksatta, loksatta news, Marathi, Marathi news
ताज्या बातम्या