पालक नेहमीच आपल्या मुलांना चांगले धडे देतात. त्यांच्या सवयीपासून ते प्रगतीपर्यंत पालकांची मोठी भूमिका असते. अगदी रस्त्यावर चालण्यापासून खाण्यापिण्यापर्यंत सगळ्याच गोष्टी पालकच आपल्या मुलांना शिकवतात. मुलांना काही कळत नाही, असं आपण अनेकदा बोलून जातो. पण सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून अनेकजण विचारात पडले आहेत. इवलीशी चिमुरडी आपल्या वडिलांना वाहतूकीचे नियम शिकवतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरील नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुरत शहर पोलिसांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये वडिलांनी वाहतूकीचे नियम मोडलेले पाहून चिमुरडी त्यांना फटकारताना दिसून येतेय. व्हिडीओच्या सुरुवातीला वडील गाडी चालवताना दिसतात तर त्यांची मुलगी मागे बसलेली असते. यातील वडील मुलीला तिच्या चुकांसाठी सुनावत असतात. तिला ओरडताना वडील म्हणतात, “कोणताही मागचा पुढचा विचार न करता तू नियम मोडलास, याचा काय परिणाम होईल, याचा अंदाज तरी आहे का? नियम आपल्या सुरक्षेसाठीच असतात. मी तुझ्यासोबत कठोर वागत नाही म्हणून तू बिघडली आहेत. यापुढे तुझ्या प्रत्येक चुकांसाठी तुला शिक्षा मिळणार.” मुलीला सुनावत असताना वडील आपली कार चुकीच्या मार्गाने वळवतात.

आजची मुलं मोठ्यांना पाहून शिकतात…

हे पाहून मुलगी वडीलांना म्हणते, “तुमच्या चुकांची शिक्षा कोण देणार?” यावर वडील विचारतात, “माझी चूक काय आहे?” त्याला उत्तर देताना मुलगी म्हणते, “तुम्ही शॉर्ट कटसाठी चुकीच्या मार्गाने गाडी चालवत आहात, ही तुमची चूक नाही का? हे तुमच्या नियमांच्या विरोधात नाही का? मुलीची ही गोष्ट तिच्या वडिलांना विचार करायला भाग पाडते. व्हिडीओच्या शेवटी मुलगी म्हणते की, “तुमची मुले तुम्हाला बघत आहेत आणि तुमच्याकडून शिकत आहेत.”

सूरत वाहतूक पोलिसांचा व्हिडीओ पहा:

वाहतूक नियमांच्या जनजागृतीसाठी सूरत वाहतूक पोलिसांनी हा व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी एक कॅप्शन देखील लिहिलीय. “चुकीच्या मार्गाने वाहन चालवणे तुम्हालाच नाही तर तुमच्यासोबत इतर नागरिकांनाही हानी पोहोचवू शकते. जेव्हा आपण वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करू तेव्हाच तरुण पिढीला याचं महत्त्व समजेल आणि भविष्यात ते सुद्धा एक सुरक्षित चालक बनतील.” तुम्हीही पहा सूरत पोलिसांचा हा व्हिडिओ …

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे आणि नेटिझन्सना विचार करायला लावणारी क्लिप पोस्ट शेअर केल्याबद्दल सूरत पोलिसांचं कौतुक केलं जातंय. या व्हिडीओमध्ये वाहतूक नियम मोडले म्हणून चूक दाखवणारी गोड मुलगी देखील नेटकऱ्यांच्या पसंतील पडली आहे. दोन दिवसांपूर्वी सूरत पोलिसांनी हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलाय. त्यानंतर अवघ्या दोन दिवसात या व्हिडीओला ९ हजारपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Little girl scolds dad for breaking traffic rules in viral video posted by surat police prp
First published on: 26-09-2021 at 19:55 IST