सोशल मीडियावर तुर्की आईस्क्रीमचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. तुम्ही हे ही पाहिलं असेल की, तुर्की आईस्क्रीम विक्रेते सहजासहजी आपल्याकडचं आईस्क्रीम समोरच्याला देत नाहीत. ते आपली कला दाखवत खेळकर पद्धतीने आईस्क्रीम देतात. अनेकवेळा तर लहान मुले आईस्क्रीम न मिळाल्याने रडायला लागतात. सध्या असाच एका चिमुरडीला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक चिमुरडी तुर्की आईस्क्रीम घेत आहे. मात्र आईस्क्रीम विक्रेता आईस्क्रीम देत नसल्याने तिला खूप राग आलेला दिसत आहे. हा आपल्याला मुद्दाम आईस्क्रीम देत नाहीये असं वाटून या चिमुरडीने रडायला सुरुवात केली. तुम्ही व्हिडिओमध्ये चिमुरडी चिडलेली आणि रडताना पाहू शकता. आईस्क्रीम विक्रेता तिच्याजवळ कोन आणून पुन्हा काढून घेताना दिसत आहे. त्यानंतर चिमुरडीला सहनच झालं नाही आणि ती आईस्क्रीम विक्रेत्यावर ओरडली. ती ओरडून रडायला लागताच त्या माणसाने लगेच तिला आईस्क्रीम कोन दिला.

( हे ही वाचा: Video: लग्नमंडपात मित्राने ‘ती’ चूक करताच नवऱ्याने त्याला चांगलंच चोपलं; नवरीने मध्यस्थी करताच तिलाही…)

( हे ही वाचा: Video: लग्नमंडपात नवऱ्याची मेव्हणीकडे भलतीच मागणी, म्हणाला “मला ५ किस…”)

हा व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे.या व्हिडिओला आतापर्यंत ७० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच अनेकजण यावर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रया देत आहेत. एकाने म्हंटलंय, “हे खूपच वाईट आहे, लहान मुलांना रडवू नये” तसंच अनेकजणांना या रडणाऱ्या चिमुरडीची कीव आली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Little girl started crying as turkish ice cream seller plays fun trick on her see what happened next gps
First published on: 24-11-2022 at 18:07 IST