scorecardresearch

Premium

“बाप्पा, मोबाईलकडे बघ..” फोटो काढण्यासाठी चिमुकलीने लाडक्या गणरायाला दिली साद, गोंडस व्हिडिओ होतोय व्हायरल

व्हायरल व्हिडीओमध्ये एक चिमुकली बाप्पाचा फोटो काढताना दिसत आहे. हा व्हिडीओ इतका गोंडस आहे, तुम्हाला-आम्हाला काय बाप्पालाही हसू आवरणार नाही.

Little Girl Trying To Click the Lord Bappa Photo Video goes viral
लाडक्या बाप्पाचा फोटो काढताना चिमुकली (फोटो सौजन्य -bhavya_13_23)

सध्या सर्वत्र गणेशोत्सव उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे. अनेकांच्या घरी लाडक्या बाप्पाचे आगमन झाले तर काही जणांच्या बाप्पाचे गौरीसह विसर्जनही झाले. गणपती बाप्पा आले की मोठ्यांपासून छोट्यांपर्यंत सर्वांना आनंद होतो. प्रत्येकाचं बाप्पासह एक खास नातं असते. लहान मुलांना तर बाप्पा खूप आवडतो. कोणी त्याला मोदक खाऊ घालते, कोणी त्याच्याशी गप्पा मारतं तर कोणी त्याची काळजी घेताना दिसते. सोशल मिडियावर चिमुकल्यांचे लाडक्या बाप्पाबरोबरचे अनेक गोंडस व्हिडीओ व्हायरल होत असतात. दरम्यान सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक चिमुकली बाप्पाचा फोटो काढताना दिसत आहे. हा व्हिडीओ इतका गोंडस आहे, तुम्हाला-आम्हाला काय बाप्पालाही हसू आवरणार नाही.

व्हायरल व्हिडीओ इंस्टाग्रामवर bhavya_13_23 अकाउंटवरून पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक चिमुकली बाप्पाचा मोबाईलमध्ये फोटो काढण्याचा प्रयत्न करत आहे. ”ती बाप्पाला मोबाईलकडे बघ, बाप्पा मोबाईलकडे बघ” असे सांगताना दिसत आहे. चिमुकलीचा निरागसपणा आणि उत्सुकता पाहून लोकांच्या चेहऱ्यांवर हसू येत आहे.

desi jugaad
Desi Jugaad : तुम्ही घरी नसताना झाडांना पाणी कोण घालणार? टेन्शन घेऊ नका, हा भन्नाट जुगाड पाहा…
dance video goes viral
तरुणाची गौतमी पाटीलला टक्कर! लावणीवर केला भन्नाट डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
desi jugaad high heels chappal
Jugaad Video : ‘खेकडा चप्पल’ पाहिली का? उंच दिसण्यासाठी केला अनोखा जुगाड, व्हिडीओ एकदा पाहाच…
Gautami Patil danced with child
Gautami Patil : “दिल है छोटा सा…” गौतमी पाटीलने केला चिमुकल्याबरोबर डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल

हेही वाचा – महिलेचा Neck Dance पाहून तुमचीही मान दुखायला लागेल? व्हायरल व्हिडीओ पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

हेही वाचा – मोदक बनवण्यापासून सजावटीपर्यंत, लाडक्या बाप्पाच्या घरात सुरू आहे उंदीर मामांची लगबग, Viral Video एकदा पाहाच

लहान मुलं फोटो काढताना नेहमी इकडे तिकडे पाहत असतात. त्यांचे फोटो नेहमी इकडे तिकडे पाहताना येतात त्यामुळे पालक फोटो काढतांना मुलांना आवर्जून सांगतात की, मोबाईलकडे बघ, कॅमेऱ्याकडे बघ….अगदी त्याचप्रमाणे ही चिमुकली देखील तिच्या लाडक्या बाप्पाला सुचना देताना दिसत आहे. व्हायरल व्हिडीओ लोकांना प्रचंड आवडला आहे. लोकांनी व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले की, ”असे वाटतेय की बाप्पा तिच्याकडे पाहात आहे.” दुसऱ्याने लिहिले की, ”याला म्हणतात देवावर विश्वास ठेवणे. तिला बाप्पा तिथे आहे असे वाटते आहे त्यामुळे ती बाप्पाशी बोलते आहे.” तिसऱ्याने लिहिले, ”किती गोंडस, किती निरागस असतात लहान मुलं”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Little girl trying to click the lord bappa photo video goes viral snk

First published on: 24-09-2023 at 12:18 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×