करीना कपूरच्या दुपट्टा मेरा गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; व्हिडीओ व्हायरल!

हा व्हिडीओ डान्सर असलेल्या उदय सिंग या युजरने इंस्टाग्रामवर अपलोड केला आहे. याला तब्बल ९ दशलक्ष व्हूज आहेत.

viral video of girls dance
व्हायरल व्हिडीओ (फोटो: deepak__singad_dd3/ Instagram )

सोशल मिडियावर डान्सच्या व्हिडीओचा धुमाकूळ असतो. सोशल मीडिया लोकांच्या डान्सच्या व्हिडीओंनी भरलेले आहेत. अशातच लोकप्रिय करीना कपूरच्या दुपट्टा मेरा गाण्यावर तीन लहान मुलींचा असाच एक व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाला आहे. तरुण मुली ज्या पद्धतीने नाचत आहेत त्यानं नेटिझन्सला थक्क केलं आहे. त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

हा व्हिडीओ डान्सर असलेल्या उदय सिंग या युजरने इंस्टाग्रामवर अपलोड केला आहे. याला तब्बल ९ दशलक्ष व्हूज आहेत. व्हिडीओमध्ये मुली उत्साहाने नाचत होत्या आणि त्यांच्या स्टेप्स अतिशय ठळकपणे दिसत होत्या. सलवार आणि कुर्ता परिधान करून त्यांचा उत्साही डान्सने तुमचे नक्कीच मन जिंकेल जाईल.

( हे ही वाचा: Viral: कागदाच्या तुकड्याकडे पाहत असलेल्या धोनी, रवी शास्त्री आणि हार्दिकच्या फोटोवर मिम्सचा पाऊस! )

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

“मस्तच, बरोबर?”, एकाने कमेंट केली. “बहुत हार्ड डान्स है,” दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले. तिसऱ्या वापरकर्त्याने टिप्पणी केली, “अगदी सुंदर.”

दुपट्टा मेरा हे २००१ मध्ये आलेल्या ‘मुझे कुछ कहना है’ चित्रपटातील एक गाणं आहे ज्यात करीना कपूर, तुषार कपूर आणि अमरीश पुरी मुख्य भूमिकेत होते. हे अनुराधा श्रीराम यांनी गायले होते आणि संगीत अनु मलिक यांनी दिले होते. समीरने गीते लिहिली आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Little girls abandoned dance to kareena kapoors dupatta mera song video goes viral ttg