Viral video: सोशल मीडियावर आपल्याला बऱ्याच लहान चिमुकल्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात. कधी हे व्हिडिओ गमतीदार असतात तर कधी व्हायरल व्हिडिओत चिमुकल्यांचा भन्नाट डान्स असतो. सध्या एका चिमुकलीचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र तिचा डान्स पाहून तो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.आजकालची मुलं ही चांगलीच करामती आहेत. धावत्या जगाशी स्पर्धा करणारी आजची ही मुलं आहेत. दिसायला छोटी जरी असली तरी ही मुलं कधी काय करतील हे सांगता येत नाही. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ याचीच प्रचिती करुन देणारा आहे.

सोशल मीडिया हे लोकांसाठी आपल्या कला सादर करण्याचे एक अनोखे माध्यम बनले आहे. कोणी डान्स, तर कोणी स्टंट, तर कोणी चित्रकलेच्या माध्यमातून आपले कौशल्य जगासमार मांडतात. गेल्या काही दिवसांपासून काही चिमुकलींचा डान्स हा नेटकऱ्यांना वेड लावतं आहे. काय ती अदा, काय तो नखरा, काय ते डान्स स्टेप्स या तरुणींचा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एकदा पाहून पण नेटकऱ्यांचं मन भरतं नाही आहे. ते हा व्हिडीओ वारंवार पाहतं आहेत. आतापर्यंत या व्हिडीओ हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहून प्रत्येका तोंडून एकच वाक्य निघतंय क्या बात है.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, २ चिमकल्या भन्नाट डान्स करत आहेत. “कजरा मोहब्बतवाला” गाण्यावर या चिमकल्यांनी जबरदस्त असा डान्स केला आहे. ज्यामधील तिच्या अदा आणि डान्स स्टेप्सची सर्वांनाच भुरळ पडली आहे. डान्स व्हिडिओ पाहून तुमचेही पाय थिरकल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांचा डान्स आणि एकेक अदा इतक्या सुंदर आहेत की पाहणाऱ्याला आपोआप भुरळ पडते. त्यांच्या या अदांवर नेटकऱ्यांनीही चांगल्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत. तरुणीच्या डान्स प्रमाणेच त्यांच्या लूकनेही पाहणाऱ्यांना चांगलेच वेड लावले आहे.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील shiva_isha_ni या अकाउंटवर शेअर केला असून, यावर आतापर्यंत साठ हजारांहून अधिक व्ह्युज मिळाल्या आहेत, तर एक लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. यावर अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत.