लिफ्टमध्ये अडकलो तर? हा विचारही आपल्याला भीतीदायक वाटतो. या भीतीने अनेकजण एकट्याने लिफ्टमध्ये जायला घाबरतात. लिफ्ट बंद पडल्यास त्या बंद जागेत जीव गुदमरणे, श्वास घ्यायला अडचण येणे, स्वाभाविक आहे. तांत्रिक बिघाडामुळे लिफ्ट बंद पडण्याच्या समस्येला अनेकवेळा सामोरे जावे लागते. याच समस्येला सामोरे गेलेल्या लहान मुलींचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तीन लहान मुली लिफ्टमध्ये अडकल्याचे दिसत आहे.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ गाझियाबाद येथील आहे. या व्हिडीओमध्ये तीन लहान मुली लिफ्टमध्ये अडकल्याचे दिसत आहेत. लिफ्ट अचानक बंद पडल्याने या मुली घाबरल्याचे पण नंतर एकमेकींना धीर देत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या मुलींचे अशा परिस्थितीतही न घाबरता एकमेकींना धीर देण्याचे आणि तिथून बाहेर पडण्याचे प्रयत्न पाहून नेटकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आहे. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

mumbai ban on slum demolition marathi news, slums mumbai marathi news
झोपडपट्टी पुनर्विकासात परवानगीविना अतिरिक्त झोपड्या तोडण्यावर बंदी, नव्या परिपत्रकामुळे झोपडीवासीयांना दिलासा
article about conspiracy to defame the judiciary constitution protection by judiciary
लेख : न्यायपालिकेच्या बदनामीचे षड्यंत्र!
traffic problem in Pune
पुण्यातील बिघडलेल्या वाहतूक समस्येची उच्च न्यायालयाकडून दखल, परिस्थितीचा फेरआढावा घेण्याचे पुणे पोलीस आयुक्तांना आदेश
chinese company spending huge amount on shameless sales training skills for employees
“तुम्ही जितके निर्लज्ज व्हाल तितका तुमचा पगार वाढेल”, ‘ही’ कंपनी कर्मचाऱ्यांना देत आहे निर्लज्ज होण्याचे प्रशिक्षण

आणखी वाचा: वऱ्हाडासाठी बुक केले संपूर्ण विमान; Viral Video ने जिंकली नेटकऱ्यांची मनं

व्हायरल व्हिडीओ:

या व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी पालकांना याबाबत सावध होण्याचे आवाहन केले आहे. नेटकऱ्यांनी यावर काय प्रतिक्रिया दिल्या पाहा.

आणखी वाचा: शेजाऱ्यांनी चक्क घरच खांद्यावर उचलून घेतले अन्…; कारण जाणून तुम्हालाही वाटेल कौतुक

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया:

आणखी वाचा: ‘जेव्हा ती एकटी…’ मुंबई लोकलमधील हा व्हिडीओ व्हायरल का होतोय एकदा पाहाच

या मुलींच्या पालकांना आणि सोसायटीमधील इतर सदस्यांना या घटनेबद्दल समजताच, त्यांनी लिफ्ट उघडण्याचा प्रयत्न केला आणि मुलींना सुखरूप बाहेर काढण्यात आले. भविष्यात अशी परिस्थिती उद्भवल्यास त्यातून काही गंभीर परिणाम होऊ नयेत यासाठी पालकांनी काळजी घेण्याचा, लहान मुलांना लिफ्टमध्ये एकटे न पाठवण्याचा सल्ला नेटकऱ्यांनी दिला आहे. तर काहींनी लिफ्टमध्ये लिफ्टमॅन असणे आवश्यक आहे, अशी मागणी केली आहे.