scorecardresearch

पालकांना प्रेक्षकांमध्ये पाहून चिमुकलीच्या आनंदाला पारावार उरला नाही; पाहा गोंडस Viral Video

नेटकऱ्यांची मनं जिंकणाऱ्या या व्हिडीओला ४० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत

पालकांना प्रेक्षकांमध्ये पाहून चिमुकलीच्या आनंदाला पारावार उरला नाही; पाहा गोंडस Viral Video
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतील चिमुकलीची प्रतिक्रिया चेहऱ्यावर हसू आणणारी आहे (फोटो: सोशल मीडिया)

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये लहान मुलांचेही गोंडस व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. असाच एक गोंडस व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या चिमुकलीचे निरागस हावभाव मन जिंकणारे आहेत.

मोठ्यांप्रमाणे लहान मुलांनाही आपल्याला कौतुकाची थाप मिळावी अशी अपेक्षा असते. त्यातच आपल्या माणसांकडुन जर ही कौतुकाची थाप मिळाली तर तो क्षण अमुल्य असतो. असेच काहीसे या व्हायरल व्हिडीओमध्ये घडले आहे. यामध्ये एक लहान मुलगी तिच्या इतर मित्र मैत्रीणींसह स्टेजवर उभी आहे. तिथे उपस्थित असणारे प्रेक्षक टाळ्या वाजवत आहेत, यावरून या मुलांनी आताच काही सादरीकरण केले आहे याचा अंदाज येतो. त्यांच्यात उभी असणारी एक चिमुकली प्रेक्षकांमध्ये तिच्या पालकांना शोधत असल्याचे दिसत आहे. जेव्हा तिला तिचे पालक दिसतात, तेव्हा तिच्या आनंदाला पारावार उरत नाही. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आणखी वाचा: Video: शिस्त म्हणजे शिस्त! कळपातून वेगळं धावणाऱ्या हत्तीच्या पिल्लांना हत्तीने कसा धडा शिकवला पाहा

व्हायरल व्हिडीओ:

पालकांना पाहताच ही लहान मुलगी आनंदात टाळ्या वाजवू लागते, तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आलेलेही दिसत आहेत. या प्रतिक्रियेने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओला ४० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-12-2022 at 15:46 IST

संबंधित बातम्या