Frog Found In Noodles: चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी लोक रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवण करतात. पण तुमच्या आवडीच्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलात आणि तिथे जाऊन तुमच्या जेवणात काही तरी विचित्र आढळले तर तुम्ही आयुष्यात पुन्हा कधी त्या ठिकाणी जाणार नाही. असेच काहीसे एका व्हायरल व्हिडीओमधील व्यक्तीसोबत घडले आहे. या व्यक्तीने एका रेस्टॉरंटमधून नूडल्स मागवल्या आणि ते खाताना त्यात त्याला जिवंत बेढूक आढळला. जपानमधील एका व्यक्तीसोबत हा प्रकार घडला आहे.

रेस्टॉरंटच्या नूडल्समध्ये निघाला जिवंत बेडूक

काइतो (@kaito09061) नावाच्या व्यक्तीने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये त्याने उदोन नूडल्स ( गव्हाच्या पिठापासून तयार केलेल्या नूडल्स, जो जपानमधील लोकप्रिय पदार्थ आहे) मागवले. या अर्धा नूडन्स खाल्ल्यानंतर त्या व्यक्तीला त्याच्या कपामध्ये एक जिवंत बेडूक हलताना दिसला. या व्यक्तीने जपानी भाषेत ट्विटरवर हा व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करीत लिहिले की, तो एका बिझनेस ट्रिपसाठी गेला होता आणि त्याने टेकअवे ऑर्डर दिली होती. त्याने ‘उदोन’ हा जपानी फास्टफूड रेस्टॉरंटमधून मागविला होता. तो तिखट उदोन खात होता त्याच वेळी त्याची नजर एका लहान बेडकावर गेली, जे पाहून तो थक्क झाला.

amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Shocking video Komodo Dragon Eat Goat In Just 5 Seconds Animal Video Viral
“या” महाकाय प्राण्यानं ५ सेकंदात गिळली जिवंत बकरी; पोटातून येतोय रडतानाचा आवाज, VIDEO पाहून काळजाचं पाणी होईल
Python Eating Deer In 12 Second Omg Video Viral Shocking video
VIDEO: चपळता हरली! १२ सेकंदात गिळलं जिवंत हरीण, अजगराची थरारक शिकार पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
lion attacked the leopard Video
‘शेवटी त्याच्या जीवन-मरणाचा प्रश्न होता’, सिंहाने केला बिबट्यावर हल्ला; पण बिबट्याने केलं असं काही… पाहा थरारक VIDEO
How To make Bharleli Shimala Mirchi
Stuffed Shimla Mirchi : दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी बनवा ‘भरलेली सिमला मिरची’; झटपट, झणझणीत सोपी रेसिपी नक्की वाचा
Pizza Hut sells pizza with deep-fried frog topping in China
“हे चीनी लोक काहीही खातात”; चीनच्या पिझ्झा हटमध्ये विकला जातो तळलेल्या बेडकाचा पिझ्झा, फोटो होतोय तुफान Viral
Gulabjamun paratha
गुलाबजामून पराठा कधी खाल्ला आहे? व्हिडीओ होतोय व्हायरल

हेही वाचा – खेळता खेळता वॉशिंग मशीनमध्ये जाऊन बसला लहान मुलगा, दुसऱ्याने केला स्विच ऑन…धक्कादायक व्हिडिओ पाहून अंगावर येईल काटा

हेही वाचा- कधीही पाहिला नसेल असा जुगाड! कारच्या सेफ्टीसाठी पठ्ठ्याने लावली अतरंगी फ्रेम! पाहा Video

शेवटचा घास खाताना दिसला बेडूक

नूडल्समध्ये आढळलेल्या बेडकाचा त्याने व्हिडीओ शूट केला. काईतो याने सांगितले की, त्याने खाण्यापूर्वी कपामधील नूडल्स एकत्र केले होते. जेव्हा नूडल्स संपविणार होता त्याच वेळी त्याला त्यात बेडूक दिसला. त्याने पुढे सांगितले की त्याने या प्रकाराची तक्रार केल्यानंतर हे रेस्टॉरंट फक्त तीन तास बंद होते आणि नंतर पुन्हा सुरू झाले. रेस्टॉरंटमध्ये आताही तेच फूड विकत आहेत. नूडल्स रेस्टॉरंटने पुढच्या दिवशी आपल्या वेबसाइटच्या माध्यमातून माफी मागितली. त्यांनी सांगितले की त्यांच्या कारखान्यामध्ये हे घडले असावे. कंपनीने घोषणा केली की कच्च्या भाज्यांसोबत खाद्यपदार्थ विक्री करणे तात्पुरत्या काळासाठी बंद करीत आहोत

Story img Loader