Viral Video: अनेकांना किचनमध्ये काम करताना अन्नपदार्थ उघडे ठेवण्याची सवय असते. डाळ, भाजी किंवा दूधही गरम केल्यानंतर काही लोक त्यावरील प्लेट थोडी उघडी ठेवतात; जेणेकरून त्यातील गरम वाफ बाहेर निघेल. पण, ही सवय तुमच्या आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकते. कारण- घरात विविध प्रकारचे किडे, पाली फिरत असतात. त्या नकळत कधी जाऊन अन्नपदार्थ उष्टावतील याची तुम्हालाही कल्पना नसते. सध्या अशाच एका किचनमधील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात पाल चक्क एका भांड्यातील कॉफीचा आस्वाद घेताना दिसत आहे.
पाल भांड्यातील कॉफी चाटत असतानाचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. समोर आलेल्या व्हिडीओत तु्म्ही पाहू शकता की, गॅसवर एका भांड्यात कॉफी बनवून ठेवलेली आहे. त्याच भांड्यावर चढून एक पाल कॉफी चाटत असल्याचे दिसत आहे. यावरून तुम्हाला कल्पना येईल की, किचनमध्ये अन्नपदार्थ उघडे ठेवल्यानंतर क्षणात त्या अन्नपदार्थांचे विष कसे बनू शकते.
Read More Trending News : वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी चढाओढ, धक्काबुक्कीत भाजपाच्या महिला आमदार पडल्या रेल्वे ट्रॅकवर; Video व्हायरल
दरम्यान, हा व्हिडीओ devil_in_my_mind_1 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला भरपूर लाइक्स आणि कमेंट येताना दिसत आहेत. ज्यांना अन्न झाकून ठेवण्याचा कंटाळा येतो अशा लोकांनी हा व्हिडीओ जरूर पाहावा. दरम्यान, युजर्सनी या व्हिडीओवर खूप कमेंट्स केल्या आहेत.
हेही वाचा – मुलं मोबाईलला हात लावताना १०० वेळा विचार करतील; वापरा फक्त शिक्षकांनी Video मध्ये दाखवलेली ‘ही’ ट्रिक
एका युजरने लिहिलेय की, हे खूपच धक्कादायक दृश्य आहे. दुसऱ्या एका युजरने लिहिलेय की, पाल विषारी नसली तरी तिच्यात मोठ्या प्रमाणात बॅक्टेरिया असतात. त्यामुळे कोणतेही अन्नपदार्थ झाकून ठेवा. तिसऱ्या एका युजरने लिहिलेय की, अशा प्रकारे अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता आहे.