Lockdown News Fact Check : THIP Media : भारतात HMPV च्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. यातच सोशल मीडियावर या आजाराविषयी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जात आहेत. दरम्यान, HMPV रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन, इन्स्टाग्रामवर एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल केली जात आहे. या पोस्टमध्ये दावा केला जात आहे की, भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या पोस्टमुळे आता विविध चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे आम्ही या पोस्टची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा एक वेगळेच सत्य समोर आले आणि ते काय आहे याबाबत जाणून घेऊ…

काय होत आहे व्हायरल?

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये दावा केला जात आहे की, भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

Finance Minister Ajit Pawar
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंच्या काळातील शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधा योजना बंद होणार? कारण काय?
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
pune city 24 hours ban on heavy vehicles
पुणे : अवजड वाहनांना शहरात २४ तास बंदी
Mumbais Water for All policy provided 7868 new water connections by December 2024
कळवा, मुंब्रा आणि दिव्यात शुक्रवारी पाणी नाही, एमआयडीसीच्या जलवाहिनीवर तातडीची दुरुस्ती
Maharashtra kesari 2024 Wrestler Chandrahar Patil Supported Shivraj Rakshe Actions and Blames Umpire Decision
Maharashtra Kesari 2025: “लाथ काय अशा पंचांना गोळ्या घालत्या पाहिजेत …”, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांचा शिवराज राक्षेला पाठिंबा
Karnataka Congress differences news in marathi
कर्नाटक काँग्रेसमधील मतभेद उघड ; मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सल्लागाराचा राजीनामा
Request to Urban Development Minister eknath shinde for Uruli-Phursungi TP scheme
उरुळी-फुरसुंगी ‘टीपी’साठी नगरविकास मंत्र्यांना साकडे!
What Narendra Modi Said?
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य, “नेहरू-इंदिरा गांधींपासून काँग्रेसच्या सरकारांमध्ये १२ लाखांवर ३ लाखांचा कर…”

तपास :

लॉकडाऊन म्हणजे काय आणि ते कधी लागू केले जाते?

लॉकडाउन हा आपत्कालीन परिस्थितीत समुदायातील इतर लोकांशी संपर्क मर्यादित करण्यासाठी लागू केलेला प्रतिबंधात्मक उपाय आहे. त्याच्या अंतर्गत लोकांच्या सुरक्षिततेसाठी सामाजिक मेळावे किंवा बाहेर जाण्यास मनाई असते. या उपाययोजनेला लॉकडाउन, असे म्हणतात.

लॉकडाऊनचा उद्देश म्हणजे परिसरातील हिंसाचार किंवा साथीचे आजार यांसारख्या सुरक्षेशी संबंधित विविध धोकादायक परिस्थितींपासून लोकांचे संरक्षण करणे हा आहे. करोना साथीच्या काळात, विषाणूचा प्रसार कमी करण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी जगभरात वेगवेगळ्या स्तरांवर लॉकडाऊन लागू करण्यात आला होता.

संपूर्ण लॉकडाऊनमध्ये लोकांना घरातच राहण्यास सांगितले गेले आणि त्यांना या काळात फक्त आवश्यक कामांसाठी, जसे की अत्यावश्यक सेवा घेण्यासाठी बाहेर जाण्याची परवानगी असते. या काळात देश आणि राज्यांच्या सीमा बंद केल्या जातात. हवाई, रस्ते आणि सार्वजनिक वाहतूक यांसारख्या प्रवासी वाहतुकीवरही निर्बंध असतात.

भारतात लॉकडाऊन कधी लागू करण्यात आला?

अलीकडच्या काळाबद्दल बोलायचे झाले, तर करोना साथीच्या आजारादरम्यान भारतात लॉकडाऊनची परिस्थिती होती. कोविड-१९ साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ मार्च २०२० पासून देशभरात २१ दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली होती. राष्ट्राला उद्देशून केलेल्या एका खास भाषणात पंतप्रधान म्हणाले होते की, सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा असलेले देशही या विषाणूला रोखू शकलेले नाहीत आणि तो कमी करण्यासाठी सामाजिक अंतर हा एकमेव पर्याय आहे.

सध्या लॉकडाऊन जाहीर झाला आहे का?

नाही. सध्याHMPV मुळे अनेक प्रकारच्या सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, भारतात पुन्हा लॉकडाऊन जाहीर होणार आहे. पण असे होणार नाही. कारण- सरकारने लोकांना आश्वासन दिले आहे की, भारत या समस्येला तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. एचएमपीव्हीमुळे साथीचा रोग होण्याची किंवा लॉकडाऊनची आवश्यकता भासण्याची शक्यता कमी आहे. पूर्णत: स्वच्छता राखणे आणि मूलभूत खबरदारी घेणे या बाबी संसर्गाचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात.

व्हायरल पोस्टमध्ये पंतप्रधानांचा सध्याचा व्हिडीओ असल्याचे सांगत एक व्हिडीओ व्हायरल केला जात आहे; पण तो व्हिडीओ २०२० सालचा आहे, जेव्हा कोरोना काळात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्याची लिंक खाली दिली आहे:

सध्याच्या वृत्तानुसार २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यामुळे राजधानी दिल्लीत कडक सुरक्षा आणि कडक नियम लागू केले जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, रस्ते बंद होऊ शकतात आणि वाहतूक इतर दिशेने वळवली जाऊ शकते, ज्यामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाणाऱ्या आणि येणाऱ्या लोकांवर परिणाम होऊ शकतो. यासंबंधीच्या समस्या कमी करण्यासाठी, एअर इंडियाने प्रवाशांना प्रवासाचे नियोजन करताना या गोष्टी लक्षात ठेवण्यास सुचवले आहे.

निष्कर्ष :

लॉकडाऊन लागू करण्याबाबतची कोणतीही माहिती सरकारने अधिकृतपणे दिली आहे किंवा सरकारने कोणतेही विधान जारी केलेले नाही. म्हणून वरील तथ्यांच्या आधारे, असे म्हणता येईल की, देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन लागू केला जाईल, असा केला जाणारा दावा पूर्णपणे खोटा आहे.

(ही कथा मूलतः THIP Media ने प्रकाशित केली आहे आणि ‘शक्ती कलेक्टिव्हचा एक भाग म्हणून ‘लोकसत्ता’ने याचे भाषांतर करून ती पुनर्प्रकाशित करीत आहे.)

तथ्य जाँचः क्या भारत देश में 21 दिन का लॉक डाउन लगने वाला है?

Story img Loader