काही ठिकाणी घनदाट जंगलातून धडधड करत एक्स्प्रेस सुसाट आपल्या प्रवासाला निघालेली असते. अशावेळी भरधाव वेगानं जाणाऱ्या ट्रेनसमोर अचानक रेल्वे रुळावर वन्य प्राण्यांचा मुक्तसंचार होत असतो. रात्रीच्या वेळी रानावनात भटकणारे हे प्राणी रल्वे रुळ ओलांडून जीव धोक्यात टाकत असतात. अनेक ठिकाणी ट्रेनच्या धडकेत मुक्या जनावरांचा मृत्यू झाल्याचं अनेक व्हिडीओंच्या माध्यमातून समोर आलं आहे. पण काही वेळा लोको पायलटच्या सतर्कतेमुळं प्राण्यांचा जीव वाचल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. अशाच प्रकारच्या एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोको पायलटला हत्तींचा कळप रेल्वे रुळ ओलांडताना दिसला, अन्…

वेस्ट बंगालच्या एका जंगलातून रेल्वे रुळावरून भरधाव वेगानं जाणाऱ्या एक्स्प्रेससमोर हत्तींचा कळप आला. मात्र, हत्ती रेल्वे रुळ ओलांडताना लोको पायलटने पाहिले अन् प्रसंगावधान राखून एक्प्रेसचे एमर्जन्सी ब्रेक लावले. लोको पायलटच्या सर्तकतेमुळं तीन हत्तींचा जीव वाचला. ही घटना राजा भट खावा स्टेशन परिसरात घडली असून संपूर्ण दृष्य कॅमेरात कैद झाली आहेत. हा व्हिडीओ भारतीय वन विभागाचे अधिकारी (IFS) प्रवीण कासवान यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. लोको पायलट एल के झा आणि सहाय्यक लोको पायलट अरींदम बिश्वास यांनी एमर्जन्सी ब्रेक लावून हत्तींचे प्राण वाचवल्यानं सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

नक्की वाचा – भयंकर! आईने पोटच्या लेकराच्या डोळ्यात टाकली मिरची पावडर, कारण वाचून धक्काच बसेल, Video होतोय तुफान Viral

इथे पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तब्बल ३१००० हून अधिक व्यूज मिळाले असून २३००० लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. वेळेवर ब्रेक लावून हत्तींचे प्राण वाचवल्याने दोन्ही लोकोपायलटवर सोशल मीडियावर स्तुतीसुमने उधळली जात आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं, सर्वांचं जीवन मूल्यवान आहे. हत्तींची काळजी घेतल्याबद्दल त्यांना देवाकडून भरपूर आशिर्वाद मिळावा. प्राण्यांच्या आयुष्याचा खेळ करणारी विकासकामे होऊ नयेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loco pilots pull emergency brakes saves wild elephants while crossing tracks video goes viral indian forest service nss
First published on: 04-12-2022 at 15:45 IST