Supriya sule photo on times Square: लोकासभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामधील सर्वात हाय व्होल्टेज असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जनतेने परत एकदा सुप्रिया सुळे यांनाच पसंती दिली. बारामतीकरांची लेकीला पसंती राहिली हे दिसून आलं, कारण सुप्रिया सुळे यांनी तब्बल दीडा लाखांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला. बारामती लोकसभा मतदार संघामध्ये येणार सहा विधानसभा मतदारसंघांमधील आकडेवारी पाहिली तर पाच मतदारसंघात त्यांना लीड मिळालं आहे. यानंतर सगळीकडे सप्रिया सुळेंच्या विजयाचे बॅनर झळकल्याचं पाहायला मिळालं. मात्र आता साता समुद्रापार न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरमध्ये सुप्रिया सुळे यांच्या अभिनंदनाचे बॅनर झळकले. सुप्रिया सुळे यांचे चाहते परीक्षित तळोकार यांनी या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.

न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरमध्ये सुप्रिया सुळे-शरद पवारांचे बॅनर्स पाहायला मिळाले. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचा फोटो या न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर लावला आहे. यावर अभिनंदन असं लिहलं आहे. सुप्रिया सुळेंच्या हे अभिनंदनाचे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यामुळे अमेरिकेतही सप्रिया सुळेंच्या लोकप्रियतेचा डंका पाहायला मिळाला.

Loksatta Documentary Discovery channel David Attenborough Director
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: ‘पाहण्या’च्या पर्यायांत दिशादर्शक…
Donald trump and jagannath rathyatra connection
“भगवान जगन्नाथांनी वाचवले डोनाल्ड ट्रम्प यांचे प्राण”; काय आहे डोनाल्ड ट्रम्प आणि भगवान जगन्नाथ रथयात्रेचे कनेक्शन?
Hardik Ananya Ambani Wedding Video
VIDEO : हार्दिक-अनन्याच्या डान्सवरून रियान पराग का होतोय ट्रोल? युजर्स म्हणाले, ‘असं काय आहे त्याच्यामध्ये…’
talibani rules afghanistan
संगीत ऐकणे, हुक्का पिणे आणि महिलांच्या सजण्यावरही बंदी; अफगाणिस्तानमध्ये नक्की घडतंय तरी काय?
Mahindra SUV discounts in June 2024:
टाटा-महिंद्रकडून ‘एसयूव्ही’च्या किमतीत कपात
Nita Ambani Cries Hugging Rohit Sharma Video
नीता अंबानी रोहित शर्माला मिठी मारून रडल्या, तर सूर्याला.. राधिका- अनंतच्या संगीत सोहळ्यातील नवा Video पाहिलात का?
South Korea semiconductor sector booms after friendship with America
चिप-चरित्र – दक्षिण कोरिया : चिपक्षितिजावरचा ध्रुवतारा
South African fans object to Surya's catch
सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा

दौंड विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे राहुल कुल आमदार आहेत. या मतदारसंघातूनही सुप्रिया सुळेंना २६,३३७ चं लीड मिळालं, इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणे आमदार असून त्या ठिकाणीही सुप्रिया सुळेंना २५, ९५१ मतांच लीड, अजित पवार यांचा स्वत:चा मतदार संघ असलेल्या बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना सर्वाधिक ४७,३८१ मतांच लीड मिळालं. पुरंदरमध्ये काँग्रेसचे संजय जगताप आमदार असून त्या ठिकाणीही ३५ हजार मतांचं लीड, भोर तालुक्यातही सुप्रिया सुळे यांना दुसरं सर्वाधिक ४३,८०५ लीड मिळालं. भोरमध्ये काँग्रसचे संग्राम थोपटे आमदार आहेत. खडकवासला येथे सुप्रिया सुळे यांना फटका बसला, या ठिकाणी सुनेत्रा पवार यांना २०,७४६ मतांचं लीड मिळालं होतं. तर सुप्रिया सुळे यांना एकूण ७,३१,४०० तर सुनेत्रा पवार यांना एकूण ५,७३,३९१ मते मिळाली आहेत तर सुप्रिया सुळे एकूण १, ५८, ००९ लीडने निवडून आल्या.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> PHOTO: “उधार फक्त ‘या’ लोकांनाच दिले जाईल” दुकानाबाहेरील ही पुणेरी पाटी पाहून पोट धरुन हसाल

हा व्हिडीओ andparikshitspeaks नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. तर समर्थकही यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.