Puerto Mosquito School Girl Video : लाइटहाऊस जर्नालिझमला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जाणारा एक व्हिडीओ आढळला, ज्यामध्ये एक शाळकरी विद्यार्थिनी दोरीच्या साहाय्याने कमीत कमी आधार घेत अतिशय धोकादायक पद्धतीने नदी ओलांडताना दिसतेय. यात नदीतील पाण्याचा फोर्स इतका आहे की, ज्यात चुकूनही कोणी दोरीवरून हात सुटून पडलं तर वाहत जाईल. पण, विद्यार्थी अशी जीवघेणी कसरत करून शाळा गाठतायत. दरम्यान, हा धडकी भरवणारा व्हिडीओ भारतातील असल्याचा दावा केला जात आहे. पण, खरंच हा व्हिडीओ भारतातील आहे का, या विषयी सत्य जाणून घेऊ…

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर आफ्रिनने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह व्हायरल व्हिडीओ शेअर केला.

इतर सोशल मीडिया युजर्सदेखील असाच दावा करत हा व्हिडीओ शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही व्हिडीओमधून घेतलेल्या कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च करून तपास सुरू केला.

आम्हाला आढळले की, हा व्हिडीओ दोन वर्षांपूर्वीही अपलोड करण्यात आला होता.

त्यानंतर आम्ही एक साधारण कीवर्ड सर्च केला, ज्यामुळे आम्हाला फेसबुकवर अपलोड केलेला एक व्हिडीओ सापडला.

त्याच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले होते की : कोलंबियातील एक तरुण शाळकरी मुलगी, केवळ साहस आणि झिपलाइनच्या मदतीने दररोज वेगाने वाहणारी नदी पार करते.

आम्हाला व्हायरल व्हिडीओचा स्क्रीनशॉट २०२२ मध्ये अपलोड केलेल्या एका लेखातही सापडला.

https://zonacero.com/generales/que-peligro-colgados-de-garruchas-ninos-atraviesan-el-rio-gaira-para-ir-al-colegio

लेखात म्हटले होते : सांता मार्टाच्या ग्रामीण भागातील पुएर्तो मॉस्किटो परिसरात पालक आणि शिक्षकांनी रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओमध्ये शाळकरी मुलांना शाळेत जाण्यासाठी दररोज जीवघेण्या परिस्थितीचा सामना करावा लागतो हे दिसून येते.

या मुलांना शाळेत जाण्यासाठी दोरीला लटकून नाईलाजाने गैरा नदी पार करावी लागतेय. हे पुएर्तो मॉस्किटो परिसरातील दृश्य आहे.

आम्हाला २०२२ मध्ये एक्सवर पोस्ट केलेला व्हिडीओदेखील सापडला. त्यात म्हटले होते: #Magdalena जीव धोक्यात घालून, #SantaMarta शहरातील पुएर्तो मॉस्किटो गावातील मुले आणि मुली शाळेत जाण्यासाठी दोरीला लटकून गैरा नदी पार करतात. एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी पूल बांधण्याची मागणी आदिवासी नेते करत आहेत.

आणखी एका बातमीनुसार, ही घटना कोलंबियातील सांता मार्टा शहराच्या ईशान्येकडील पुएर्तो मॉस्किटो परिसरातील असल्याचे दिसून आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निष्कर्ष : कोलंबियातील एक शाळकरी मुलगी नदी पार करण्यासाठी झिपलाइन वापरत असल्याचा जुना व्हिडीओ भारतातील असल्याचा दावा करून शेअर केला जात आहे. हा व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.