West Bengal Burns Over Waqf Bill : वक्फ कायद्याच्या निषेधार्थ मुर्शिदाबादमध्ये तीव्र हिंसाचाराची घटना घडली, ज्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले. अशात लाइटहाऊस जर्नलिझमला याच घटनेसंबंधित दावा करणारा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे आढळून आले. त्यात जमाव एका पोलिसावर हल्ला करताना दिसतायत; पण खरंच पश्चिम बंगालमध्ये अशा प्रकारची कोणती घटना घडली का? याविषयीचे सत्य जाणून घेऊ…
काय होत आहे व्हायरल?
The Sanatani Emperor या एक्स युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
इतर युजर्सदेखील तोच व्हिडीओ शेअर करीत आहेत.
तपास :
व्हायरल व्हिडीओमधून मिळालेल्या स्क्रीनशॉटवर रिव्हर्स इमेज सर्च करून आम्ही तपास सुरू केला.
रिव्हर्स इमेज सर्चदरम्यान, आम्हाला एबीपी आनंदाच्या यूट्यूब चॅनेलवर व्हिडीओ सापडला. हा व्हिडीओ पाच वर्षांपूर्वी अपलोड करण्यात आला होता. त्याच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे : Local people clash for lori accident in Nabadwip.
abplive.com वरील एका बातमीत नमूद केले आहे : वाळूने भरलेल्या लॉरीने धडक दिल्याने सायकलवरून प्रवास करणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाल्याने नादियाच्या नबाद्वीप पोलिस ठाणे परिसरात तणावाची घटना, स्थानिकांना रस्ता रोखत पोलिसांशी झटापट केली.
बातमीत असेही म्हटले आहे की, अनेक पोलिस जखमी झाले आहेत.
निष्कर्ष :
पश्चिम बंगालच्या नबाद्वीपमधील एक जुना व्हिडीओ आता अलीकडील म्हणून शेअर केला जात आहे. तो वक्फ कायद्याविरोधात मुर्शिदाबादमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेशी जोडला जात आहे. व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.