पिठात थुंकून तंदूरी रोटी बनवण्याचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ लखनऊच्या काकोरी शहरातील आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आणि हॉटेल मालकासह सहा कर्मचाऱ्यांवर त्वरीत गुन्हा दाखल केला. अटक केल्यानंतर आरोपींना पोलीस ठाण्यात आणण्यात आले व त्यानंतर कडक सूचना देऊन सायंकाळी उशीरा त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

हा किळसवाणा प्रकार लखनऊमधल्या काकोरी येथील हौदा तालाब वॉर्डजवळील रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेलमधला आहे. इमाम अली असं हॉटेलचे नाव आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओनुसार, इथले कर्मचारी तंदूरवर रोटी भाजत आहे. त्याचवेळी तंदूरच्या भट्टीजवळ आणखी तीन तरुण उभे आहेत. ग्राहकही येत-जात असताना दिसून येत आहेत. या दरम्यान, हॉटेलचे कर्मचारी पिठापासून रोटी बनवतो आणि नंतर त्यावर थुंकताना दिसून येत आहेत. यानंतर, तो रोटी तंदूरमध्ये शिजवण्यासाठी ठेवतो. त्याच्या शेजारी उभे असलेले इतर दोन कर्मचारीही त्याच्या या किळसवाण्या कृत्याला विरोध करत नाहीत. हा व्यक्ती लागोपाठ किळसवाणे कृत्य करताना दिसून येत आहे, असे असतानाही तिथला एकही ग्राहक याला विरोध करत नाही.

Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात
whatsapp and instagram down
व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम सेवा खंडीत; जाणून घ्या मध्यरात्री काय झालं?
pilots missing What happened to Vistara
३८ हून अधिक उड्डाणे रद्द, तासभराचा उशीर, वैमानिक गायब; ‘विस्तारा’चं काय बिनसलं?

आणखी वाचा : VIRAL VIDEO : मुलीने झाडावर ठोशांचा इतका भडीमार केला की पुढे जाऊन जे घडलं ते पाहून तुम्ही हैराण व्हाल !

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL : नवरीचा डान्स पाहून नवरदेवाची सटकली, भरमांडवात घेतला काडीमोड

इमाम अली हॉटेलचा हा व्हिडीओ मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली. एसीपी काकोरी आशुतोष कुमार यांनी निरीक्षक जितेंद्र बहादूर सिंग यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर व्हिडीओच्या आधारे हॉटेल मालक याकूब, कर्मचारी दानिश, हाफिज, मुख्तार, फिरोज आणि अन्वर यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून स्थानिक लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पोलिसांनी आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : खादाड नवरीबाई! काही क्षणात बोहल्यावर चढणार, पण चायनीज स्नॅक्स खाण्याचा मोह काही आवरला नाही

लखनऊचे हे किळसवाणे प्रकरण काही पहिल्यांदा घडले नाही, याआधी गाझियाबाद आणि मेरठमधूनही असे व्हिडीओ समोर आले आहेत. मेरठमध्ये लग्न समारंभात थुंकून रोटी बनवण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ठाणे कंकरखेडा परिसरातील सगाई समारंभात तंदूर कारागीर नौशाद थुंकून रोटी बनवताना दिसला. या घटनेनंतर त्याला अटक करण्यात आली. गाझियाबाद प्रकरणातही पोलिसांनी कारवाई केली.