Kon Honar Crorepati Gautami Patil Lavani : धकधक गर्ल माधुरी दीक्षित ही जितकी तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते तितकीच ती तिच्या नृत्यासाठी ओळखली जाते. माधुरीला बॉलीवूडची ‘डान्सिंग क्वीन’ म्हणूनही ओळखले जाते, ती तिच्या उत्कृष्ट नृत्यासाठी आणि अप्रतिम हावभावांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. कथ्थक या शास्त्रीय नृत्यात पारंगत असलेल्या माधुरीने बॉलीवूड नृत्याला एक वेगळीच उंची मिळवून दिली आहे तर दुसरीकडे ‘सबसे कातिल’ गौतमी पाटील म्हणून ओळखली जाणारी गौतमी पाटील तिच्या डान्स शैली, स्टेज शो आणि लावणी नृत्यामुळे ग्रामीण आणि शहरीभागात खूप लोकप्रिय ठरलेली नृत्यांगणा आहे. जेव्हा अशा दोन प्रसिद्ध नृत्यांगणा एकाच मंचावर येतात तेव्हा चर्चा तर होणारच. ‘कोण होणार करोडपती’ शोदरम्यान गौतमी पाटीलने लावणी नृत्य सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

करोडपती’च्या मंचावर माधुरी दिक्षीतसमोर थिरकली गौतमी

‘कोण होणार करोडपती’ या शोचे होस्टिंग पहिल्यांदाच माधुरी दीक्षित करत आहे. याच मंचावर नुकतीच सोशल मीडिया सेन्सेशन आणि प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील आणि लोकप्रिय अभिनेता शिव ठाकरे यांनी हजेरी लावली होती. यावेळी माधुरीने दोघांचे स्वागत केले आणि मनमोकळ्या गप्पाही मारल्या. दरम्यान, गौतमी पाटील हिने माधुरी दिक्षीतसमोर नृत्य करण्याची संधी सोडली नाही.

‘पाटलांचा बैलगाडा’ गाण्यावर अफलातून लावणी

कोण होणार करोडपतीच्या मंचावर ‘पाटलांचा बैलगाडा’ या गाण्यावर ठसकेबाज अंदाजमध्ये गौतमीने अफलातून लावणी सादर केली. तिच्या कातील अदा, हावभाव आणि हटके नृत्यशैलीने तिने पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांचे मन जिंकले आहे.

माधुरी दीक्षितकडून नृत्याचे कौतुक आणि प्रोत्साहन

यावेळी माधुरी दिक्षीत यांनी गौतमीचे नृत्य पाहून थक्क झाल्याचे दिसते. यावेळी टाळ्या वाजवून त्यांनी तिला प्रोत्साहन दिल्याचेही दिसते.

अस्सल मराठमोळा अंदाज

यावेळी गौतमीने पांरपारिक नऊवारी साडी नेसली होती. नाकात नथ, गळ्यात ठुशी आणि हातात हिरव्या बांगड्या परिधान करून ती अस्सल मराठमोळ्या अंदाजमध्ये अत्यंत सुंदर दिसत होती.

माधुरी आणि गौतमीच्या भेटीची सोशल मीडियावर चर्चा

मराठी मनोरंजन विश्वातील दोन पिढ्यांमधील आणि दोन भिन्न शैलींच्या नृत्यांगणांचे एकाच मंचावर येणे ही प्रेक्षकांसाठी एक मोठी पर्वणीच ठरली आहे. एका बाजूला बॉलिवूडच्या क्लासिकल आणि ग्रेसफुल डान्सची शान असणाऱ्या माधुरी दीक्षित आणि दुसऱ्या बाजूला लोकप्रिय नृत्यंगण गौतमी पाटील यांना एका मंचावप पाहणे अतिशय रंजक ठरले.