scorecardresearch

क्षणाचाही विलंब न करता महिला कॉन्स्टेबलने वाचवले प्रवाशाचे प्राण; अंगावर शहारा आणणाऱ्या घटनेचा Video पाहाच

महिला कॉन्स्टेबलचे धाडसी कृत्य रेल्वे स्थानकातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाले आहे

क्षणाचाही विलंब न करता महिला कॉन्स्टेबलने वाचवले प्रवाशाचे प्राण; अंगावर शहारा आणणाऱ्या घटनेचा Video पाहाच
एक महिला कॉन्स्टेबलने कार्यतत्परतेमुळे एका प्रवाशाचा जीव बचावला आहे. (Photo : Twitter)

‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय मध्य प्रदेशातील रतलाम रेल्वे स्थानकात आला आहे, कारण एका महिला कॉन्स्टेबलच्या कार्यतत्परतेमुळे एका प्रवाशाला जीवदान मिळालं आहे. रेल्वेत चढताना प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्यामध्ये पडलेल्या एका प्रवाशाला महिला कॉन्स्टेबलने अत्यंत चपळाईने वाचवलं आहे. या घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

शिवाय काही क्षणांचा विलंब झाला असता तर या प्रवाशाला आपला जीव गमवावा लागला असता.महिला कॉन्स्टेबलच्या या धाडसी कृत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी या महिला पोलिसाचं कौतुक केलं आहे.

हेही पाहा- आनंद महिंद्रा यांनी ट्विट केला हवेत उडणाऱ्या बाईकचा Video; म्हणाले, “जगभरातील पोलीस दलात…”

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील असून रतलाम स्थानकात ड्युटीवर असणाऱ्या एका महिला कॉन्स्टेबलने प्रवाशाचा जीव वाचवला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत रतलाम रेल्वे स्थानकात एक लेडी कॉन्स्टेबल उभी असल्याचं दिसत आहे. यावेळी तेथून एक रेल्वे जाताना दिसत आहे. यावेळी एक प्रवाशी उशिर झाल्यामुळे प्लॅटफॉर्मवरुन धावत येत असल्याचं दिसत आहे.

हा प्रवासी धावत येतो आणि ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतो, तो ट्रेममध्ये चढत असताना अचानक प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्यामध्ये पडतो. यावेळी तिथे उपस्थित असलेली महिला कॉन्स्टेबल क्षणाचाही विलंब न करता धावत जाऊन पडलेल्या प्रवाशाचा हात धरून त्याला मागे ओढते. ज्यामुळे तो प्रवासी सुखरुप बचावला आहे.

हेही वाचा- लोकल ट्रेनच्या सीटवर आढळला वापरलेला कंडोम, फोटो Viral होताच प्रवाशांनी व्यक्त केला संताप

महिला कॉन्स्टेबलच्या या धाडसी कृत्य रेल्वे स्थानकात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाले आहे. तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसंच ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाला कोणतीही गंभीर दुखापत झाली नसून त्याचे समुपदेशन करून इच्छितस्थळी पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, रेल्वे पीआरओ खेमराज मीना यांनी सांगितले की, जीआरपी पोलिसांच्या महिला कॉन्स्टेबलने यांनी एका प्रवाशाचे प्राण वाचवले आहेत. ही मोठी शौर्याची बाब असून हे धाडसी कृत्य करणाऱ्या महिलेचा लवकरच गौरव करण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2023 at 17:28 IST

संबंधित बातम्या