Shocking video: माणूस हा पाण्याचा बुडबुडा आहे, असं म्हणतात. आपल्यासोबत कधी काय होईल, याचा काहीच भरवसा नाही. त्यामुळे आपण आयुष्य जगताना सर्वांशी चांगलं वागलं पाहिजे. गरजूला मदत केली पाहिजे. कारण- त्यामुळे आपण या जगात जेव्हा नसू तेव्हा हे जग आपलं नाव काढेल किंवा जगाला आपलं स्मरण होईल, असं म्हटलं जातं. त्यामुळे माणसानं माणुसकी कधीच सोडू नये. मात्र, हल्ली आजूबाजूला अशा घटना घडतात की, खरंच आता माणुसकी शिल्लक आहे का, असा प्रश्न पडतो. आजच्या काळात माणुसकी पूर्णपणे नाहीशी झालीय असे वाटण्यासारख्या घटना आजूबाजूला पाहायला मिळतात. अशीच एक संतापजनक घटना मध्य प्रदेशातून समोर आली आहे. त्यामध्ये पतीच्या मृत्यूनंतर रुग्णालय कर्मचाऱ्यांनी त्याचा बेड चक्क त्याच्या गर्भवती पत्नीकडून साफ करून घेतला. यासंबंधीचा सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुम्हालाही संताप येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मध्य प्रदेशातील दिंडोरीतून हा संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णालयातील रक्ताने माखलेला त्याचा बेड त्याच्या पाच महिन्यांच्या गर्भवती पत्नीकडून साफ करून घेण्यात आला. रामराज मारवी (२८) असे मृताचे नाव आहे. जमिनीच्या वादातून दोन भाऊ आणि वडिलांनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला होता.

नेमकं काय घडलं?

रामराजवर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर त्याला गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पतीच्या मृत्यूचा प्रचंड आघात झाल्याचे माहीत असतानाही त्या दु:खी स्त्रीकडून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तिचा पती ज्या बेडवर उपचार घेत होता, तो बेड साफ करून घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, दिंडोरी जिल्ह्यात गुरुवारी २०-२५ हल्लेखोरांच्या टोळक्याने एकाच कुटुंबातील तीन जणांची हत्या केली. धरम सिंग मारवी आणि त्यांची मुले रघुराज मारवी व शिवराज मारवी अशी पीडितांची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी गरदासरी आरोग्य केंद्रात नेण्यात आले. त्या ठिकाणी शिवराज यांचा मृत्यू झाला आणि इतर दोघांना पोहोचताच मृत घोषित करण्यात आले.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ही महिला रुग्णालयातील बेडवरचे रक्त पुसताना दिसत आहे. यावेळी रुग्णालयातील कर्मचारी त्या महिलेला पाणी देताना दिसत आहेत. अशा प्रकारे माणुसकी संपल्याचं जिवंत उदाहरण या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे. व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावरही संतापाची लाट उसळली आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: मंदिरात किंवा गर्दीच्या ठिकाणी तुमचीही चप्पल चोरीला जाते का? मग हा जुगाड कराच, कधीच चप्पल चोरी होणार नाही

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. सखोल चौकशीनंतर जे जबाबदार असतील, त्यांच्यावर तत्काळ कारवाई केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. रुग्णालय प्रशासनाकडे याबाबत विचारणा केली असता, ती महिला पुराव्यासाठी रक्ताचे नमुने गोळा करीत होती, कारण- तिच्या पतीने बेदम मारहाण केली होती. तिला कोणीही बेड साफ करण्यास सांगितले नव्हते, अशी माहिती देण्यात आली.