scorecardresearch

डॉमिनोज पिझ्झा गर्लला लेडी गॅंगकडून बेदम मारहाण, VIRAL VIDEO पाहून लोक थक्क

या व्हिडीओमधली पीडित तरुणी त्यावेळी लोकांना मदतीची याचना करत होती मात्र कोणीही तिला मदत केली नाही. गंभीर बाब म्हणजे चार मुलींनी मिळून तिला लाठीकाठीने मारहाण केली आहे. या व्हिडीओमधील दृश्य अंगावर काटा आणणारे आहेत.

Dominos-Pizza-Girl
(Photo: Twitter/ ladyofequality )

आतापर्यंत तुम्ही मुलांना रस्त्यावर भांडताना आणि एकमेकांना लाठ्या-काठ्या मारताना पाहिले असेल. सध्या सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल होतोय तो मलांच्या मारामारीचा नव्हे तर मुलींच्या हाणामारीचा आहे. लेडी गॅंगच्या या हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमधली पीडित तरुणी त्यावेळी लोकांना मदतीची याचना करत होती मात्र कोणीही तिला मदत केली नाही. गंभीर बाब म्हणजे चार मुलींनी मिळून तिला लाठीकाठीने मारहाण केली आहे. या व्हिडीओमधील दृश्य अंगावर काटा आणणारे आहेत.

खरं तर हा व्हिडीओ मध्य प्रदेश मधील इंदौरचा आहे, ज्यात द्वारकापुरी भागात डॉमिनोज पिझ्झामध्ये काम करणाऱ्या एका मुलीला रस्त्यावर बेदम मारहाण करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये चार मुली पिझ्झा महिला कर्मचाऱ्याला काठीने मारहाण करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ही पीडिता जोरजोरात ओरडत आहे आणि ओक्साबोक्शी रडत आहे. पण तिचे कोणीही ऐकत नाही. आजूबाजूला काही लोक जमलेले दिसून येत आहेत. पण त्यापैकी कुणीही तिला मदत करण्यासाठी पुढे सरसावत नाही.

आणखी वाचा : हत्तीचा वाढदिवस! अशा अनोख्या स्टाईलमध्ये गजराजने मानले आभार, VIRAL VIDEO पाहून आनंद महिंद्रा सुद्धा फिदा!

मुलीचे केस ओढून ढकलून तिला रस्त्यावर फेकलं. पण त्या मुलीची कोणालाच दया आली नाही. कसंबसं उठल्यावर ही मुलगी या चार मुलींपासून वाचण्यासाठी घराकडे धाव घेताना दिसतेय. पण लेडी गॅंग तिची पाठ सोडत नाहीत. पीडित मुलीला चक्क लाथाबुक्क्या आणि ठोश्यांनी मारत तिला गंभीर जखमी केलं. इतकंच नव्हे तर तिला सतत कानशिलात मारत होते.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : चालत्या रिक्षातून बाळ रस्त्यावर पडलं, अन् जीव धोक्यात घालून ट्रॅफिक पोलिसाने वाचवले प्राण

मारहाण झालेली मुलगी ही पिझ्झा डिलिव्हरी पर्सन म्हणून काम करते, असे सांगण्यात येत आहे. पीडित तरुणी आपल्याकडे पाहत होती आणि म्हणून तिला मारहाण केली, असा आरोप चार मुलींनी केला होता. पीडितेने या मुलींना पोलिसात तक्रार करणार असल्याचे सांगितल्यावर या लेडी गॅंगने तिला आणखी मारहाण केली. बिनधास्त पोलिस स्टेशनमध्ये तक्रार कर, असं म्हणत तिला बेदम मारहाण केली.

आणखी वाचा : किचनमध्ये काम करताना मुलीने गायलेलं कोक स्टुडिओमधलं ‘Pasoori’ गाणं VIRAL, सुरेल आवाजाने तुम्ही प्रसन्न व्हाल!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

मात्र, आता याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही मुलगी डॉमिनोजची कर्मचारी असल्याचे सांगितले जात आहे. तिला मारहाण करणाऱ्या चार मुली स्थानिक टोळीतील सदस्य असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडीओ आरोपींनीच शेअर केला आहे. त्यानंतर तो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागलाय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-06-2022 at 13:40 IST

संबंधित बातम्या