Shocking video: मुंबईची लाइफलाइन असलेल्या लोकलमध्ये नेहमीच जागेच्या वादावरून भांडणं होतांना दिसतात. लोकलमधील गर्दी, चौथ्या सिटसाठी हाणामारी होत असते. गर्दीत धक्का लागल्यानं या महिलांमध्ये इतका वाद झाला की, वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. एकमेकांचे केस ओढेपर्यंत ही हाणामारी झाली.मुंबईच्या लोकल ट्रेनमधील पुरुष आणि महिलांच्या डब्यात होणारी वादावादी आणि हाणामारी सर्वांनाच माहित आहे. महिलांच्या गुंडगिरीची अशीच घटना पुन्हा एकदा समोर आली आहे, या भांडणाचा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल. एवढंच नाहीतर ही भांडणं चक्क कुंभमेळ्याला जाताना ट्रेनमध्ये घडली आहे. यावेळी या महिलांनी ट्रेनच्या डब्यामध्ये अक्षरशछ: हद्दच पार केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कुंभ मेळा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा धार्मिक सोहळा आहे. शेकडो वर्षांपासून कुंभ मेळ्याची परंपरा सुरू आहे. कुंभ मेळ्यासाठी देशातूनच नव्हे, तर जगभरातील भाविक हजेरी लावतात. यंदाचा कुंभ मेळा अनेक अर्थांनी खास आहे. कारण- यंदाचा कुंभ हा महाकुंभ असणार आहे. यामुळेच लोक मोठ्याप्रमाणात कुंभमेळ्याला येत आहेत. याच भाविकांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने प्रयागराज येथील कुंभमेळ्यासाठी विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले. मात्र तरीही ट्रेनमधल्या गर्दीचं नियोजन करता आलं नाही. अशातच आता धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

या व्हिडीओमध्ये बायका एमकेकांना अक्षरश: अमानुषपणे मारहाण करत आहेत. बसण्याच्या जागेवरून झालेला वाद हाणामारीत बददला आणि या महिलांनी अक्षरश: एकमेकांवर उड्या मारून लाथा बुक्क्यांची बरसात केली. लोकलमध्ये प्रचंड गर्दी दिसत आहे. नीट उभं राहायलाही जागा दिसत नाहीये, अशातच काही वेळात एक महिलांमध्ये तुफान हाणामारी सुरु होते. या मारामारीचं स्वरुप इतकं गंभीर आहे की, यामध्ये एखाद्याचा जीव जाऊ शकतो. यात एका महिलेला काही महिला केसाला धरुन बेदम मारत आहेत. अक्षरश: या एकमेकींचे केस ओढून कानाखाली मारत आहेत, गळा पकडत आहेत. व्हिडिओत हाणामारी पाहून महिला प्रवाशी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र काही केल्या त्या ऐकत नाही. 

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ _royal_desi_chhora नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या सगळ्या प्रकारावर आता नेटकरीही संतापले असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “अरे पाप धुवायला जाताय की करायला?” तर आणखी एकानं “अरे आपण कुठे चाललोय याचं तरी भान ठेवा” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahakumbh mela video viral women fight while traveling to prayagraj by train shocking video goes viral srk