Happy Maharashtra Day 2025 Wishes Messages SMS: महाराष्ट्र ही थोर महात्म्यांची भूमी आहे. जिथे संत ज्ञानेश्वर महाराजांपासून तुकोबांपर्यंत, छत्रपती शिवाजी महाराजांपासून संभाजी महाराजांपर्यंत, महात्मा फुलेंपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अनेक थोर मंडळींचा जन्म झाला. दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्र दिन जल्लोषात साजरा केला जातो कारण याच दिवशी आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. साधारण ६४ वर्षांपूर्वी १९६० मध्ये १ मे रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली होती. या दिवशी महाराष्ट्रात सर्वत्र उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण असते. सर्व लोक पारंपरिक महाराष्ट्रीय पोशाख परिधान करतात आणि महाराष्ट्रीय संस्कृतीचा गौरव करतात. एकमेकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या जातात. आजकाल सोशल मीडियावर एकमेकांना शुभेच्छा पाठवण्याची पद्धत आहे. तुम्हालाही सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर महाराष्ट्र दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा येथे दिल्या आहेत ज्या व्हॉट्सअॅप, मेसेजद्वारे एकमेकांना पाठवू शकता.

महाराष्ट्र दिन विशेष मराठी शुभेच्छापत्र तुम्ही मोफत डाऊनलोड करून शेअर करू शकता. तुमच्या मित्रमंडळींना, कुटुंबाला, सहकाऱ्यांना सोशल मीडियावर पाठवण्यासाठी ही मराठी शुभेच्छापत्रे पाहा

महाराष्ट्र दिनाच्या मराळमोळ्या शुभेच्छा!

Happy Maharashtra Day 2025 Wishes in Marathi
महाराष्ट्र दिन २०२५ शुभेच्छा संदेश (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

“छत्रपतींच्या महाराष्ट्राला, ज्ञानेश्वर-तुकारामांच्या संस्कृतीला,
आणि मराठी अस्मितेला सलाम!
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!”

धन्य ती महाराष्ट्राची माती!
धन्य ते माय मराठीचे नाते
या पवित्र धरणीला कोटी कोटी नमन
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

Happy Maharashtra Day 2025 Wishes in Marathi
महाराष्ट्र दिन २०२५ शुभेच्छा संदेश (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

(फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बाप महाराष्ट्राचा, महाराष्ट्राची माय,
रयतेचे छत्रपती आमचे शिवराय…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा..
दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा..
जय जय महाराष्ट्र माझा…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Maharashtra Day 2025 Wishes in Marathi
महाराष्ट्र दिन २०२५ शुभेच्छा संदेश (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

तुमच्या आयुष्यात महाराष्ट्राच्या भूमीचे तेज,
संस्कृतीचा गंध आणि भाषेचा गर्व नेहमी राहो.
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

महाराष्ट्राची यशो गाथा,
महाराष्ट्राची शौर्य कथा,
पवित्र माती लावू कपाळी,
धरणी मातेच्या चरणी माथा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Maharashtra Day 2025 Wishes in Marathi
महाराष्ट्र दिन २०२५ शुभेच्छा संदेश (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मंगल देशा… पवित्र देशा… महाराष्ट्र देशा…
प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा….
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

“माझा महाराष्ट्र – माझा अभिमान!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Maharashtra Day 2025 Wishes in Marathi
महाराष्ट्र दिन २०२५ शुभेच्छा संदेश (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

कपाळी लावूनी केसरी टिळा,
नमन करितो महाराष्ट्र देशा तुला
जय महाराष्ट्र!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ढोल ताश्याच्या गजरात व्हावा उत्सव महाराष्ट्राचा,
उत्सव माझ्या माय मराठीचा”
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Maharashtra Day 2025 Wishes in Marathi
महाराष्ट्र दिन २०२५ शुभेच्छा संदेश (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)