‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील…’ ट्रेंडींग ओळींवर ‘या’ पठ्ठ्याने बनवलं गाणं; Video Viral

शंतनू पोळ या युट्युबरने व्हायरल ओळींवर एक भन्नाट गाणं बनवलं आहे.

mla shahaji patil audio clip
मजेशीर गाण्याचा व्हिडीओ व्हायरल (फोटो: Shantanu Pole / YouTube )

Eknath Shinde: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबतचे ४० बंडखोर आमदार तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असे शिवसेनेत उघड दोन गट पडले आहेत. सध्या राज्यातील सत्तासंघर्षाचे केंद्र सध्या गुवाहाटी बनलेलं असताना या सत्ताकारणाच्या वातावरणात एक ऑडिओ क्लिप सध्या प्रचंड व्हायरल होतेय. शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांची ही ऑडिओ क्लिप असून यातील त्यांचे संवाद सध्या सोशल मीडियावर बरेच चर्चेत आलेत. त्यांच्या ऑडिओ क्लिपमधले हे संवाद सध्या सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आलेत. त्यांच्या या संवादावर नेटकऱ्यांनी वेगवेगळे मीम्स शेअर करत आपल्या क्रिएटीव्हिटीला जागं केलंय. याशिवाय एकाने चक्क या ओळीवरून थेट गाणंच बनवलं आहे. जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोर आमदार हे गुवाहाटीत गेल्या काही दिवसांपासून थांबले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील हे ग्रामीण भागातील मतदार संघाचे नेतृत्व करत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मतदारसंघातील एका कार्यकर्त्याने शहाजी बापू पाटील यांना कॉल केला होता. त्यावेळी कार्यकर्त्यासोबत झालेला त्यांचा हा संवाद मजेदार आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये ते त्यांच्या नेहमीच्या गावरान स्टाईलमध्ये बोलताना दिसून आले. “काय झाडी… काय डोंगार… काय हाटील… एकदम ओके!’ या शब्दाने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. यावरूनच शंतनू पोळ या युट्युबरने एक भन्नाट गाणं बनवलं आहे.

(हे ही वाचा: Ranji Trophy Final: मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉने जिंकली सगळ्यांची मनं, ‘या’ कृतीमुळे होतंय कौतुक)

पाहा व्हायरल व्हिडीओ :

(हे ही वाचा: IND vs SL : ‘पेट्रोल नाही तरीही…’ श्रीलंकेतील स्मृती मंधानाच्या जबरा फॅनचे पोस्टर व्हायरल)

शहाजी बापू पाटील यांचा व्हिडीओ पाहा –

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

अवघ्या १ मिनिटाच्या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी हे गाण शेअर केलं जात आहे. अनेकांनी या गाण्यावर कमेंट्सही केल्या आहेत. एक युजर कमेंट करतो की, ‘एकदम भारी’ तर दुसरा युजर कमेंट करतो की, ‘परफॉर्मन्स.. एकदम ओके’.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra political crisis eknath shinde shiv sena mla shahaji patil audio clip from guwahati song viral ttg

Next Story
IND vs SL : ‘पेट्रोल नाही तरीही…’ श्रीलंकेतील स्मृती मंधानाच्या जबरा फॅनचे पोस्टर व्हायरल
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी