scorecardresearch

SSC HSC Exam: बोर्डाचे कॉपीमुक्त अभियान; दहावी बारावीच्या परीक्षेदरम्यान झेरॉक्स दुकानं ठेवणार बंद

Maharashtra Board Exams 2023: दहावी बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी, परीक्षा केंद्रांभोवतीची फोटोकॉपीची दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Maharashtra SSC HSC Exams 2023
फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम

Maharashtra Board Exam 2023:महाराष्ट्र सरकारने कॉपीमुक्त परीक्षा मोहीम राबविण्यासाठी कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये इयत्ता १०वी आणि १२वीच्या परीक्षेपूर्वी परीक्षा केंद्रांच्या ५० मीटरच्या आतील फोटोकॉपीची दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. महाराष्ट्र बोर्डाची बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा २ मार्चपासून सुरू होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाबाबत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉपीमुक्त परीक्षा व्हावी यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये एक भरारी पथक असणार आहे. ताच परीक्षा केंद्राच्या ५० मीटरच्या आत अनधिकृत व्यक्तींना प्रवेश बंदी असेल.

( हे ही वाचा: भारतात ‘हा’ आहे सर्वात लहान रेल्वे मार्ग; अवघ्या ९ मिनिटांत संपतो प्रवास..)

परीक्षेदरम्यान १०० मीटरपर्यंतच्या परिसरात असणारी सर्व फोटोकॉपी दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तिथेच, परीक्षा केंद्रांभोवती पोलिस बंदोबस्तही वाढवण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी नोडल अधिकारी म्हणून शिक्षण आयुक्त आणि समन्वय अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-02-2023 at 15:08 IST
ताज्या बातम्या