महाराष्ट्रातील दीक्षा शिंदेची नासाच्या फेलोशिपसाठी निवड; वय फक्त १४ वर्षे

१४ वर्षीय दीक्षा शिंदे ही महाराष्ट्रातील औरंगाबादची आहे. एवढ्या कमी वयात हे मोठ यश मिळवल्यामुळे तिचं सर्वत्र कौतुक होत आहे.

Diksha Shinde selected for Fellowships of NASA
औरंगाबादची १४ वर्षाची दीक्षा शिंदे (फोटो:ANI)

महाराष्ट्रातील औरंगाबादची १४ वर्षीय मुलगी दीक्षा शिंदेची नासाच्या एमएसआय फेलोशिप व्हर्च्युअल पॅनलवर पॅनेलिस्ट म्हणून निवड झाली आहे. १२ ते १६ जुलै २०२१ पर्यंत पॅनेलच्या बैठका झाल्या होत्या. ३ वेळा प्रयत्नानंतर दीक्षाला हे यश प्राप्त झालं आहे. “मी ब्लॅक होल्स आणि गॉडवर एक सिद्धांत लिहिला. ३ प्रयत्नानंतर नासाने ते स्वीकारले. त्यांच्या वेबसाइटसाठी त्यांनी मला लेख लिहायला सांगितले. ” असं ती एएनआयशी बोलताना म्हणाली.

दीक्षा शिंदे म्हणाली की तिने एक सिद्धांत (theory) लिहिला जो नासाने ३ प्रयत्नांनंतर स्वीकारला. मग तिला नासाच्या वेबसाइटसाठी लेख लिहायला सांगितले गेले. ती दहावीची विद्यार्थिनी आहे.तिच्या निवडीविषयी बोलताना दीक्षा म्हणते, “मला MSI फेलोशिप पॅनेलवर पॅनेलिस्ट म्हणून निवड करण्याबद्दल नासाकडून नुकताच एक ईमेल आला. मला तो मेल बघून आश्चर्य वाटले. मी माझे काम सकाळी १ ते ४ च्या दरम्यान करेन आणि मला त्यासाठी  मासिक मानधनही मिळणार आहे.”

असा होता दीक्षाचा प्रवास

दीक्षा शिंदे म्हणाली की तिने स्टीफन हॉकिंगची पुस्तके वाचली होती आणि नंतर सप्टेंबर २०२० मध्ये ‘क्विस्शनिंग द एक्सिस्टन्स ऑफ गॉड’ नावाचा एक लेख नासाला सादर केला. तिचा लेख पहिल्या प्रयत्नात नाकारण्यात आला.

तिने काही बदल करून मूळ लेख सुधारला आणि पुन्हा सबमिट केला पण तो पुन्हा नाकारला गेला.

डिसेंबर २०२० मध्ये तिने “We live in a Black Hole?” वर एक लेख सादर करण्याचा निर्णय घेतला, जो शेवटी नासाला आवडला आणि तो लेख स्वीकारला गेला.

इंटरनॅशनल जर्नल ऑफ सायंटिफिक अँड इंजिनीअरिंग रिसर्चने मे २०२१ मध्ये दीक्षा शिंदेंचा ‘ब्लॅक होल’ हा पेपर प्रकाशनासाठी स्वीकारला.

तिने आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय शोध सहयोगद्वारे आयोजित संशोधन स्पर्धा देखील जिंकली. तिने स्पर्धेत ‘मेन बेल्ट लघुग्रह’  यावर काम केलं होत.

नंतर तिला NASA कडून एक ईमेल आला, ज्याने जूनमध्ये MSI फेलोशिप पॅनेलसाठी पॅनेलिस्ट म्हणून तिच्या निवडीची पुष्टी केली.

त्यामध्ये तिच्या स्थितीत संशोधन कल्पनांचे मूल्यांकन करणे आणि नासामध्ये संशोधन करण्यासाठी सहयोगी दृष्टिकोन सादर करणे हे काम समाविष्ट आहे.

१४ वर्षीय दीक्षा १ दिवसा आड होणाऱ्या संशोधन चर्चेला उपस्थित राहते.

पार्श्वभूमी

दीक्षा शिंदेचे वडील कृष्णा शिंदे हे विनाअनुदानित खासगी शाळेचे मुख्याध्यापक असून तिची आई रंजना शिकवणी घेते.

दीक्षा शिंदेचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

 

 

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maharashtras 14 year old girl diksha shinde selected for msi fellowships virtual panel of nasa ttg