Madan Manjiri Song Lavani Video : लावणी ही महाराष्टातील लोककला आहे. गावाच्या जत्रेतून पिढ्यापिढ्या मनोरंजन करणारी लावणी आजही लोकांच्या पंसतीस उतरते. लावणी करणे ही वाटते तितके सोपे काम नाही. लावणी करण्यासाठी नृत्याची जाण तर लागतेच त्याचबरोबर नृत्य करण्यासाठी अदाही लागते. सोशल मीडियावर एकापेक्षा एक लावणी नृत्याचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये फक्त मुली आणि महिलाच नव्हे तर पुरुष आणि तरुण मुलेही लावणी नृत्य सादर करताना दिसतात. आजही हे कलाकार लावणी सादर करून महाराष्ट्राची लोककला जपत आहेत, जिवंत ठेवत आहे. सोशल मीडियावर लावणी नृत्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात पण त्यापैकी मोजके असे असतात जे प्रेक्षकांच्या मनाला भुलतात. सध्या अशाच एका लावणी सादर करणाऱ्या तरुणीचा व्हिडिओ चर्चेत आला आहे. तिने अप्रतिम लावणी नृत्य सादर केले आहे पण विशेष म्हणजे तिने राजस्थानमध्ये महाराष्ट्राची लोककला सादर केली आहे आणि तेथील लोकांचेही मन जिंकले आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुणी अत्यंत उत्साह आणि उर्जेने लावणी नृत्य सादर करत आहे. व्हिडीओमध्ये तिने प्राजक्ता माळी हिने मुख्य भूमिका साकरलेल्या फुलवंती याचित्रपटातील मदनमंजिरी गाण्यावर नृत्य सादर केले आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला ती ढोलकीच्या तालावर ठेक्यात नाचताना दिसते. त्यानंतर जसे गाणे सुरू होते तशी तशी अत्यंत सुंदरपणे नृत्य करते. तिच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि अभिनय पाहून सर्वच थक्क होतात. तरुणीचे नृत्य पाहून सर्वजण लावणी नृत्याच्या प्रेमात पडतील. सर्वजण तरुणीला प्रेरणा देत आहे. कोणी टाळ्या वाजवत आहे तर कोणी उत्साहाने ओरडत आहे.
व्हिडिओ harshadaubale_official आणि harshada_nrutyangan नावाच्या पेजवर शेअर केला आहे ज्यामध्ये ती तरुणी शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये तिने या डान्स मागील किस्सा सांगितला आहे” काही दिवसांपूर्वी मी सांस्कृतिक राष्ट्रीय शिबिरसाठी राजस्थानला गेले होते तेव्हा आम्ही पोहोचलो त्यादिवशी आमच्या स्वागताचा कार्यक्रम होता. सर्वांना आपली संस्कृती सादर करायची होती मग काय, सर्वात आधी महाराष्ट्राने नंबर लावला. ही लावणी मी सादर केल्यानंतर सगळ्या राज्यामध्ये महाराष्ट्र इतका प्रसिद्ध झाला आणि सर्वाना खूप आवडू लागला. ते लोक महाराष्ट्राची संस्कृती जाणून घेण्यासाठी आमच्याकडून रोज मराठी भाषा, संस्कृती शिकू लागले आणि सगळ्यात छान म्हणजे ते मला मराठी मुलगी, महाराष्ट्राची मुलगी हर्षदा अशा नावाने आवाज देऊ लागले. ते खूप खास आणि अभिमानाची गोष्ट होती माझ्यासाठी.
व्हिडिओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. व्हिडीओवर कमेंट करताना एकाने लिहिले की, “हर्षा ताई तुझ्या सारखं बहुमोल रत्न जर प्रत्येक आईबापांच्या पोटी जन्माला आले तर त्याचा सार्थ अभिमानच वाटेल!”
दुसऱ्याने कमेंट केली की,”हर्षदादीदी सर्वप्रथम अभिनंदन की आपल्या महाराष्ट्राच नाव तू तिथ जाऊन मोठं केलंस आणि तुझ्या नृत्य सादरिकरणाने त्याची शोभा आणखी वाढवली. एकदम झकास डान्स केला. जबरदस्त ऊर्जा,अचूक वेळ, सुंदर हावभाव….देव तुझे भलो करो. अशीच पुढे जा.”
lavanipremi या पेजवरही हा व्हिडिओ शेअर केला आहे जिथे कौतुक करताना एकाने लिहिले की,”जय महाराष्ट्र…. ताई खरंच खूप सुंदर महाराष्ट्रच लोकनृत्य अर्थात लावणी खूप सुंदर पद्धतीने सादर केली.”
दुसरा म्हणाला की, याला म्हणतात लावणी! काय वेग आहे खतरनाक!
तिसरा म्हणाला की, “नाद खुळा डान्स केला आहे ताईने”