देशातील प्रमुख ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा ही आपल्या शक्तिशाली स्पोर्ट युटिलिटी व्हेइकल्स (SUV) च्या निर्मितीसाठी ओळखली जाते. या कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी महिंद्रा बोलेरो कार अनेक दशकांपासून रस्त्यांवर चांगली कामगिरी करत आहे. अशातच या कारचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ही कार जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावरुन धावताना दिसत आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे ही महिंद्रा बोलेरो रेल्वे रुळावरुन धावताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. महत्वाची बाब म्हणजे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनादेखील तो व्हिडीओ शेअर करण्याचा मोह आवरता आला नाही. कारण आपल्या कंपनीची गाडी अशा ठिकाणी धावत असल्याचं पाहून तेदेखील आश्चर्यचकित झाले आहेत.
हेही पाहा- हत्ती गाडीजवळ येताच पर्यटकांची भीतीने उडाली गाळण; थेट मंत्र म्हणायला केली सुरुवात; Video पाहून पोट धरुन हसाल
हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे, ज्यामध्ये महिंद्रा बोलेरो SUV काश्मीरमधील चेनाब नदीवर बांधण्यात येत असलेल्या पुलावर सर्वेक्षण वाहन म्हणून वापरण्यात येत आहे. हा पूल जगातील सर्वात उंच रेल्वे कमान पूल असून त्याचे बांधकाम सध्या सुरू आहे. या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलेली बोलेरो एसयूव्ही रेल्वे ट्रॅकवर सर्व्हे कार म्हणून कस्टमाइज करण्यात आली आहे.
हेही पाहा- विनाहेल्मेट एकाच स्कुटीवरुन ४ मुलींचा जीवघेणा प्रवास; भरधाव वेगात सेल्फी काढतानाचा Video पाहून नेटकरी संतापले
एसयूव्हीला ट्रॅकवर आणण्यासाठी खास प्लॅटफॉर्म तयार करण्यात आल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. पुलाचे बांधकाम सुरु असताना एसयूव्ही रुळांवर धावताना दिसत आहे. काश्मीरमधील चेनाब पूल नदीपात्रापासून हा पूल ३५९ मीटर उंचीवर आहे. त्यामुळे या पुलाच्या उंची आयफेल टॉवरपेक्षाही उंच आहे. हा व्हायरल व्हिडिओ राजेंद्र बी. आकलेकर यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.
व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना आनंद महिंद्रा म्हणाले की, बोलेरोची क्षमता नवीन उंची गाठत आहे. या दृश्यावरुन हे स्पष्ट होत आहे की, महिंद्राच्या संस्थापकांनी स्वतंत्र भारतात ऑफ-रोड वाहने बनवण्याचा निर्णय का घेतला होता, कारण जिथे रस्ता नाही तिथे जाण्यासाठी ही वाहने बनवण्यात आली होती, तसंच आपण हे फोटो नेहमी जपून ठेवणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. नेटकरी या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी आमचा महिंद्राच्या वाहनांवर खूप विश्वास असल्याचं म्हटलं आहे. शिवाय ही कार आपल्या देशाची ओळख असल्याचंही अनेकांनी म्हटलं आहे.