Maid Mixed urine in food viral video: आजकाल अनेकांच्या घरी मोलकरणीशिवाय कुणाचं पानही हलत नाही. सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत घरातलं सगळं कुटुंब त्या एका मोलकरणीवर अवलंबून असतं. आज जेवायला काय करू, असा प्रश्न मोलकरणीकडून नेहमीच विचारला जात असतो. पण, जर त्याच जेवणात ती असं काही मिसळत असेल; ज्यानं संपूर्ण कुटुंबाचा जीव धोक्यात आला तर… सध्या असाच गैरप्रकार उत्तर प्रदेशमध्ये घडला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यावसायिकाच्या घरात आठ वर्षं जेवण बनवणाऱ्या एका मोलकरणीनं त्यांच्या जेवणात चक्क लघवी मिसळली. आपल्या कुटुंबातील सदस्य आजारी पडल्यानंतर संशयामुळे या व्यावसायिकानं नेमक काय घडतंय हे जाणून घेण्यासाठी स्वयंपाकघरात एक मोबाईल फोन लपवून ठेवला. मग त्या मोबाईलच्या कॅमेऱ्यानं जे धक्कादायक दृश्य टिपलं, ते पाहून त्या व्यावसायिकाच्या पायाखालची जमीनच सरकली.

a woman forgot her husband while talking on a call
मोबाईलच्या नादात चक्क नवऱ्याला विसरली, पेट्रोल पंपावर आली नवऱ्याबरोबर पण.. VIDEO होतोय व्हायरल
Bangladesh pulled plug on key internet deal with India
भारताला मोठा धक्का; बांगलादेश आणि भारताचा इंटरनेट करार…
Elder man took female dog in toilet cruel video viral on social media
अरे जरा तरी लाज बाळगा! मादी श्वानाला शौचालयात नेलं अन्…, वृद्धाच्या विकृत कृत्याचा VIDEO व्हायरल
Shocking video during wedding grooms friends fello down fro dj truck while dancing
मित्राच्या वरातीत ट्रकवर चढून नाचणं आलं अंगलट; ब्रेक दाबला अन् अख्खा गृप तोंडावर आपटला, VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Viral Video
रील बनवण्यासाठी तरुणी चक्क नदीकाठच्या बॅरीकेटवर चढली अन् अचानक तोल गेला.. VIDEO होतोय व्हायरल
Shocking and emotional video of boy who Slips While Jumping Onto Another Boat In Ocean
VIDEO:“देवा पोटासाठी असा संघर्ष कुणालाच देऊ नकोस रे” विशाल समुद्रात दुसऱ्या बोटीवर उडी मारताना विक्रेत्याचा पाय घसरला अन्…
Gwalior Man Smokes Cigarette After Setting Household Items On Fire Following Quarrel With Wife
बायकोशी झालं भांडणं, नवऱ्यानं रागात सोन्यासारखा अख्खा संसार जाळून टाकला; VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
Shocking video Driver Tried To Steal Petrol From A Pump But Made One Mistake And Was Caught By The Police
VIDEO: “जेव्हा कर्माचे फळ लगेच मिळते” पेट्रालचे पैसे न देता पळून जात होता कारचालक इतक्यात डाव पलटला; नेमकं काय घडलं?

मोबाईल फोनमध्ये रेकॉर्ड झालेल्या या व्हिडीओत ती मोलकरीण चक्क जेवणात लघवी मिसळताना दिसली. पुरावा मिळाल्यानंतर त्या व्यावसायिकाने पोलिसांत तक्रार दाखल करून, दोषी मोलकरणीवर कारवाई करण्याची विनंती केली.

हेही वाचा… ट्रेनमधील स्टंट आला अंगाशी, VIDEO पाहून उडेल थरकाप; पाहा नेमकं काय झालं?

रिपोर्टनुसार व्यावसायिकाचे कुटुंब अनेक दिवसांपासून यकृताच्या समस्येने (Liver Issue) त्रस्त होते. वैद्यकीय उपचार घेऊनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यामुळेच व्यावसायिकाला संशय आला आणि त्याने स्वयंपाकघरात एक छुपा कॅमेरा सेट केला.

तक्रारीनंतर या मोलकरणीला गाझियाबाद पोलिसांनी अटक केली. या दोषी महिलेचे नाव रीना असे आहे.

हेही वाचा… “आमच्याकडे रॉकेट उडवून मिळतील”, काकांची दिवाळीआधीच जय्यत तयारी, VIDEO एकदा पाहाच

हा व्हिडीओ @sunnobc या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे आणि अनेक सोशल मीडिया अकाउंट्सवरून व्हायरल होत आहे. “तीन महिन्यांपासून मोलकरीण जेवणात मूत्र मिसळत आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाला यकृताच्या समस्येला सामोरं जावं लागलं,” अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे.

हेही वाचा… “नया है वह”, ट्रेनमधून उतरताना तरुणाबरोबर झालं असं काही की…, VIDEO पाहून डोक्यावर माराल हात

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांना हा किळसवाणा प्रकार पाहून धक्काच बसला. अनेकांनी या व्हिडीओवर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिले, “असे लोक कुठून येतात? असे करण्याची नेमकी गरज काय होती?” दुसऱ्याने, “खूप घृणास्पद”, अशी कमेंट केली.

Story img Loader