Monkey Swimming Like Pro Video: उत्क्रांतीच्या धड्यांमध्ये माणसाचा उगम हा प्राण्यापासून झाल्याचं म्हणतात. पूर्वजांना सुद्धा वानराप्रमाणे शेपूट होती, वाकून चालायची सवय होती असे अनेक दावे आजवर तुम्हीही ऐकले असतील. अलीकडे सोशल मीडियावर व्हायरल होणारे काही व्हिडीओ हे अनेकदा हेच दावे खरे सिद्ध करून जातात. असाच एक व्हिडीओ आमच्या समोर आला ज्यात माकडांची करामत बघून लोकांनी त्यांच्यावर मजेशीर आरोप केले आहेत. या माकडांना सगळं काही कळतं फक्त टॅक्स भरायचा नाहीये म्हणून प्राणी आहेत सांगतात. अशा आशयाच्या काही कमेंट्स या व्हिडीओवर होत्या. आम्ही सुद्धा जेव्हा हा व्हिडीओ पाहिला तेव्हा ही कमेंट खरीच वाटू लागली नेमकं अशी ही माकड सभा करतेय तरी काय, चला बघूया..

ऑनलाईन तब्बल ३२ हजाराहून अधिक व्ह्यूज असलेल्या या व्हिडीओने नेटकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणलं आहे. यामध्ये काही माकडे पाण्यात पोहताना दिसत आहेत. असं पाहायला गेलं तर अनेक प्राणी अगदी कुत्रा, मांजर सुद्धा थोड्या फार प्रशिक्षणानंतर बेसिक पोहू शकतात. पण हे माकड मात्र अगदी एखाद्या तरबेज तज्ज्ञाप्रमाणे पोहताना दिसत आहे. सुरुवातीला पाण्याच्या पृष्ठभागाखालून माकड पोहत असतं आणि मग हळूहळू श्वास घेण्यासाठी थोडं वरच्या बाजूला येतं. हे माकड दिसताना तरी जंगलात राहणारं दिसत आहे म्हणजे याला कुणीही प्रशिक्षण असं काही दिलेलं नसणारं त्याचे हे पोहण्याचं टॅलेंट स्वतःचंच असू शकतं.

Man wraps utensils in plastic to avoid washing them.
भांडी घासावी लागू नये व्यक्तीने शोधला भन्नाट जुगाड! हर्ष गोयंकांनी शेअर केला मजेशीर व्हिडीओ
How To Avoid Food Poisoning Does Chai Goes Acidic by Heating Twice
चहा, भातासह ‘हे’ ५ पदार्थ चुकूनही पुन्हा गरम करू नये, कारण.. तज्ज्ञांनी सांगितलं, अन्नातून होणारी विषबाधा कशी टाळावी?
a father beat child for his betterment by his shoes watch viral video of fathers love
लेकाच्या भल्यासाठी वडिलांनी दिला चोप, बुटाने धू धू धुतले, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “वडिलांचे असे प्रेम…”
supriya sule, ajit pawar, sunetra pawar
“दुसऱ्यांच्या घरात मी कशाला डोकावू?”, असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे

Video: माकडाला पाहून लोकं का म्हणतायत की याचा हेवा वाटतो?

हे ही वाचा<< Video: धावत्या बाईकवर बेभान जोडप्याचा रोमान्स; कारवाईनंतर पोलिसांवरच लोकांचा संताप म्हणाले, “यांना मुलं..”

“मला आजच कळलं की माकडं पण पोहू शकतात” असे कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओवरून आणि कॅप्शनवरून सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे. काहींनी म्हटले आहे की, ” इतकी गोंडस दिसणारी माकडं, हल्ला करायला आक्रमक कशी होतात कळतच नाही. पण आता ऑनलाईन बघताना तरी हे माकड क्युट दिसतंय”. काहींनी यावर मस्करीत आपल्याला या माकडांचं आयुष्य बघून हेवा वाटत असल्याचं सुद्धा म्हटलं आहे. “भाई आम्ही इथे काम करत बसलोय आणि हा रिलॅक्स करतोय”, अशा कमेंट्सवर नेटकरी हसू की रडू अशा प्रतिक्रिया देत गप्पा मारतायत.