Akhil NRD Wife Megha Bus Conductor Elopement CCTV Video Viral: मळ्याळम भाषेतील प्रसिद्ध कटेंट क्रिएटर आणि अभिनेता अखिल एनआरडी नामक तरूणाची पत्नी अचानक बेपत्ता झाल्यानंतर सोशल मीडियावर याबाबतच्या अनेक चर्चा रंगत आहेत. सोशल मीडियावरील दाव्यानुसार मेघा एका बस कंडक्टरसह पळून गेल्याचे सांगितले जात आहे. अखिल ज्याठिकाणी राहतो, त्या परिसरातील एक सीसीटीव्ही व्हिडीओही सध्या व्हायरल होत आहे. ज्यात एक महिला सामानाह घरातून पळून जाताना दिसते. पुढे जाऊन ती एका पुरूषासह गाडीत बसते. ही कथित महिला मेघा असल्याचे सांगितले जात आहे.
अखिलचा जवळचा मित्र आणि मल्याळम बिग बॉसचा माजी स्पर्धक साई कृष्णा याने मेघा पळून गेल्याच्या बातमीला दुजोरा दिला. अखिलशी याबाबत आपले बोलणे झाले असल्याचे त्याने सांगितले. या प्रकरणावर मेघा किंवा अखिल यांच्यापैकी कुणीही अद्याप अधिकृत भूमिका मांडलेली नाही.
मेघा एका बस कंडक्टरसह पळून गेल्याची माहिती बाहेर आल्यानंतर या प्रकरणाची चर्चा होत आहे. तसेच घरातून पळून जाताना मेघाने अनेक महागड्या वस्तू स्वतःबरोबर नेल्याचे सांगितले जात आहे.
अखिल एनआरडी आणि मेघादरम्यान काय झाले?
घरातून पळून गेल्यानंतर मेघा एका बस कंडक्टरबरोबर दिसल्याची सोशल मीडिया पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. तसेच अखिलच्या घराबाहेरील सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यासंबंधीच्या दाव्यांवर अधिक चर्चा होत आहे. तर काहींनी सीसीटीव्हीमध्ये दिसणारी महिला मेघा नसल्याचे म्हटले आहे.
मात्र अखिलने मेघा बेपत्ता असल्याचे सांगून पोलिसांत याबाबतची तक्रार दाखल केली. मात्र नंतर ती स्वेच्छेने घर सोडून गेली असल्याचे समोर आल्यानंतर अखिलने तक्रार मागे घेतली.
CCTV visuals Kerala YouTuber Akhil NRD's wife, Megha Nair, has run away with a bus conductor. Watch the video to see the reality behind it!#kerla #couple pic.twitter.com/fKaQ7YbCpT
— Arattai Darbar?? (@Arattai_darbar) August 12, 2026
अखिलचा मित्र साई कृष्णाने न्यूज १८ वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, मेघाबाबत कळल्यानंतर मला धक्का बसला. मी अखिलला २०२१ पासून ओळखतो आणि मी त्यांच्या लग्नालाही उपस्थित होतो. हा एक गंभीर विषय आहे. यावर चर्चा होणे गरजेचे आहे. कुणाबरोबरही अशी घटना घडायला नको. मला तर ही बातमी समजल्यानंतर धक्का बसला.
अखिल आणि मेघाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कुणीही चुकीचे अंदाज बांधू नयेत, असाही सल्ला साई कृष्णा याने सोशल मीडियावरील नेटिझन्सना दिला.
मेघा आणि अखिल एनआरडी कोण?
अखिळ एनआरडी हा मल्याळम भाषेतील प्रसिद्ध यूट्यूबर असून त्याचे ४९ लाख फॉलोअर्स आहेत. त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये अधुनमधून मेघा डोकावत असे. अखिल कटेंट क्रिएटर असल्यामुळे त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक घडामोड सोशल मीडियावर दिसत असे. नोव्हेंबर २०२४ मध्ये लग्न होण्यापूर्वी अखिल आणि मेघा एकमेकांना अनेक वर्ष ओळखत असल्याचे चौकशीतून समोर आले आहे.
अखिल एनआरडी कोण आहे?
केरळमधील प्रसिद्ध यूट्यूबर म्हणून अखिल एनआरडीची ओळख आहे. विनोदी व्हिडीओ, लहान व्हिडीओ, व्लॉग्स आणि लाइफस्टाइलशी निगडित व्हिडीओ तयार करणाऱ्या अखिल एनआरडीला सोशल मीडियावर चांगली प्रसिद्धी मिळत होती. अखिल ५ डिसेंबर १९९५ रोजी अलापुझा जिल्ह्यात जन्मला होता. पूर्ण वेळ कटेंट क्रिएटर होण्यापूर्वी तो मर्चंट नेव्हीमध्ये कार्यारत होता. यूट्यूब आणि इन्स्टाग्रामवर येण्यापूर्वी त्याने टिक टॉकवर चांगला जम बसवला होता.
