Thief Caught Red Handed CCTV Video : चोरी करण्यासाठी चोर कधी कोणती युक्त वापरेल हे सांगता येत नाही. पण चोरी करणाऱ्या चोरांबरोबरच कधी कधी विचित्र घटना घडतात, ज्या पाहून हसू आवरणे अवघड होते. कधी दारूच्या नशेत आलेला चोरटा घरात शिरुन झोपतो तर कधी चोरी केल्यानंतर चोर मजबुरीचे कारण देत माफीची नोट्स ठेवून जातो. शिकागोमध्ये घरफोडी करणाऱ्या चोराबरोबरही असाच काहीसा विचित्र प्रकार घडला. त्याचं झालं असं की, चोरी करण्यासाठी म्हणून चोर एका घरात शिरला, पण बाहेर पडताना चोर चोरी करुन नाही तर फ्राईंग पॅनने मार खाऊन बाहेर पडला. या चोरीचे नशीब पण इतके फुटके की, तो पळून जाण्याचा प्रयत्न करताच तिथे पोलीस पोहोचले. त्यानंतर जे काही झाले ते पाहण्यासाठी तुम्ही खालील व्हिडीओ पाहाच.

शिकागोमध्ये एका घरात चोरी करण्यासाठी शिरलेल्या चोराला फ्राईंग पॅनने मारहाण झाल्यानंतर पोलिसांनी पकडल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही घटना २० जून रोजी घडली. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती चोरट्याला फ्राईंग पॅनने मारहाण करून घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. ती व्यक्ती चोराला घरातून हाकलण्यासाठी हातात फ्राईंग पॅन घेऊन त्याच्या मागे धावताना दिसतेय.

girl used her amazing brain to cheat in exam paper her cleverness was see in this viral video
“व्वा ताई कमाल!” परीक्षेत कॉपी करण्यासाठी तरुणीने वापरला अनोखा जुगाड; video पाहून युजर म्हणाला….
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
live death video 17 year old boy dies during swiming in swimming pool meerut up video viral
क्षणभरात मृत्यूशी भेट! स्विमिंग पूलमधून बाहेर आला अन् झाला मृत्यू ; पाहा हृदयद्रावक घटनेचा video
Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
Rape case Story
१२ व्या वर्षी गँगरेप, १३व्या वर्षी मातृत्त्व; २४ वर्षांनी त्याच मुलाने आईचे पांग फेडले, नराधमांना शोधून घेतला बदला!
women in Mumbai Bhandup chawl dance so gracefully on marathi song
मुंबईच्या चाळीतील महिलांनी केला तुफान डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “बाईपण भारी देवा”
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
If You Dont Believe In Luck And Karma Then Just Watch This Video how man skip death
नशीब आणि कर्मावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; अवघ्या ३ सेंकदात तरुणासोबत नेमकं काय घडलं?

रिपोर्ट्सनुसार, जेसन विलियम्स नावाच्या व्यक्तीच्या घरी ही चोरीची घटना घडली. जेसम कामावरून घरी परतत असताना त्याला घरात बसवण्यात आलेल्या अलार्म सिस्टमवरून कोणीतरी घरात घुसल्याची माहिती मिळाली. जेसन त्याच्या घरापासून थोड्याच अंतरावर होता त्यामुळे काही मिनिटांतच तो घरी पोहोचला. जेसन त्या चोराला मारण्यासाठी शस्त्र शोधत होता पण त्याला काहीच सापडले नाही. या दरम्यान, त्याला फ्राईंग पॅन दिसला जो घेऊन तो चोरट्याला मारहाण करु लागला.

पहा व्हिडिओ

जेसनने सांगितले की, घरात प्रवेश करताच त्याचा चोराशी सामना झाला. जेसनने चोरावर फ्राईंग पॅनने हल्ला करून त्याला जबर मारहाण केली. चोर घरातून पळत बागेत शिरला. यावेळी जेसनने त्याचा पाठलाग करणे थांबवले नाही. चोर गेटपाशी पोहोचताच जेसनने पुन्हा एकदा त्याला फ्राईंग पॅनने मारले. यानंतर चोर घरातून पळून गेला, यावेळी तेवढ्यात तिथे पोलीस आले.

पोलिसांनी चोरट्याचा पाठलाग सुरू केला आणि त्याला ताबडतोब थांबण्याचा इशारा केला. शेवटी तो चोर थांबला आणि पोलिसांनी त्याला अटक केली. जेसनने घरात बसवलेल्या सीसीटीव्हीवरील या घटनेचा व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे, जो दीड लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. ज्यावर आता अनेक वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत.