Viral Video: मोटरसायकल डोक्यावर घेऊन तो घाटातून पायी चालत गेला; लोक म्हणाली, “याला भारताकडून ऑलिम्पिकसाठी पाठवा”

डोक्यावरुन मोटरसायकल घेऊन जाणाऱ्या व्यक्तीच्या या व्हिडीओला एका दिवसामध्ये ४४ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी त्यावर प्रतिक्रियाही दिल्यात

Man Carrying Bike On Head
हा व्हिडीओ सध्या ट्विटरवर व्हायरल झालाय

जोरदार पावसामुळे नद्यांना पूर आलेला असतानाच अनेक ठिकाणी पुराचं पाणी पुलांवरुन वाहताना लोक त्यामधून बाईकने जाण्याचा प्रयत्न करतात आणि वाहून जातात. असे प्रकार दर पावसाळ्यामध्ये घडतात आणि नंतर त्याचे व्हिडीओ व्हायरल होतात. मात्र सध्या आपल्या मोटरसायकलची अती काळजी असणाऱ्या आणि तिच्या प्रेमापोटी तिला पावसामुळे खराब रस्त्यांवरुन चालवत न नेता चक्क डोक्यावरुन नेणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर धुमाकूळ घालतोय.

सोशल नेटवर्किंगवर सध्या एका व्हायरल व्हिडीओने सर्वांना बोटं तोंडात घालण्यास भाग पाडलं आहे. या व्हायरल क्लिपमध्ये एक व्यक्ती पावसामुळे खराब झालेल्या घाटरस्त्यावर आपल्या बाईकला काही होऊ नये म्हणून ती चक्क डोक्यावर घेऊन जाताना दिसतोय. व्हिडीओमध्ये एका व्यक्ती डोंगराळ भागातील घाटातून बाईक डोक्यावर घेऊन चालताना दिसत आहे. एकीकडे घाटातील रस्ता आणि या व्यक्तीच्या डाव्या बाजूला खोल दरी असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. ही व्यक्ती डोक्यावर मोटरसायकल घेऊन हळूहळू पुढे जात असल्याचं दिसत आहे. एका मजेशीर कॅप्शनसहीत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. मुली फार चिखल झाल्याने आपले प्लॅन्स रद्द करतात तर पोरं मात्र अगदी मोटरसायकल डोक्यावर घेऊनही प्लॅन्ससाठी तयार असतात असं म्हणत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला एका दिवसामध्ये ४४ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

या व्हायरल व्हिडीओमधील व्यक्तीचे मोटरसायकलवरील प्रेम पाहून अनेकजण गोंधळले आहेत. अनेकांनी यावर मजेदार कमेंट केल्यात. पाहूयात अशाच काही कमेंट…

१) मला आधी वाटलं तो मोटरसायकल फेकून देणारय

२) पोरी असा वेडेपणा करत नाहीत म्हणून त्या जास्त जगतात

३) हा पडला असता तर

४) तर ते सरकारकडे पैसे मागतील

५) असा वेडेपणा करु नका

६) या व्यक्तीचे मित्र

७) हा खरा खिलाडी

८) रोहित शेट्टीला काढा आणि याला घ्या

९) याला ट्रेनिंग द्या

१०) खरंच हे एवढं महत्वाचं आहे का?

या व्हिडीओवर चर्चा सुरु असतली तरी नक्की तो कधीचा आहे, कुठला आहे, कोणी शूट केलाय तसेच डोक्यावर मोटरसायकल घेऊन जाणारी ही व्यक्ती कोण आहे यासंदर्भातील माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र असं असलं तरी हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतोय हे मात्र खरं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Man carrying bike on head shocking video goes viral scsg

ताज्या बातम्या